Header Ads

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी डॉ. शंकर बावडेकर.

 आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी डॉ. शंकर बावडेकर.


-------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

-------------------------------

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्लीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी कसबा बावडा येथील डॉ. शंकर बावडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. शंकर बावडेकर यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे सर, राष्ट्रीय सचिव शैलेंद्र पाटील सर तसेच कोल्हापूर जिल्हा संघटक प्रतिक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.

नियुक्तीनंतर डॉ. शंकर बावडेकर यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा मानस व्यक्त केला. मानवाधिकारांचे संरक्षण, वंचित व गरजू नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच अन्यायाविरोधात कायदेशीर चौकटीत आवाज उठविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या नियुक्तीबद्दल सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून मानवाधिकार क्षेत्रात प्रभावी काम उभे राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.