Header Ads

"मुंडेंच्या रडारवर १२ अधिकारी – पुण्यात सांगली पथकाची धाड, FDA मध्ये खळबळ!"

 "मुंडेंच्या रडारवर १२ अधिकारी – पुण्यात सांगली पथकाची धाड, FDA मध्ये खळबळ!"


अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्नभेसळखोरीविरोधात धडक कारवाईचा सपाटा लावला. ऑगस्टपर्यंत तब्बल १२ हजारांहून अधिक तपासण्या, हजारो सुधारणा नोटिसा आणि शेकडो परवाने निलंबित करण्यात आले.  

पुणे विभागातही कारवाईचा वेग वाढला असून अवघ्या २१ दिवसांत ८४९ आस्थापनांची तपासणी झाली. गणेशोत्सवाच्या काळात बुधवारपेठेत दोन ट्रकवर धाड टाकण्यात आली. विशेष म्हणजे, या कारवाईसाठी स्थानिक पथकाऐवजी सांगलीचे पथक पुण्यात आणण्यात आले. यामुळे स्थानिक यंत्रणेवरील विश्वासाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.  

दरम्यान, पुण्यातील काही नामांकित व्यवसायिकांवरील कारवाई, सोनई डेअरी व गोवर्धन दूध डेअरीशी संबंधित प्रकरणांबाबतही चर्चेला उधाण आले आहे. काही प्रकरणांमध्ये तडजोडीच्या चर्चाही रंगल्या आहेत.  

मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, अकोला आणि बुलढाणा येथील १२ अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबन व विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. FDA विभागातील ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण, याबाबतही चर्चेला उधाण आले आहे.

No comments:

Powered by Blogger.