मस्क्युलर डिस्ट्रॉफी ग्रस्त रुग्णांची सेवा रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी..
मस्क्युलर डिस्ट्रॉफी ग्रस्त रुग्णांची सेवा रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी
कोल्हापूर: प्रतिनिधीं.
शारिरीक दिव्यांगत्वावर मात करत, कुशाग्र बुद्धीचा वापर करून गुणात्मक प्रगतीची शिखरे ओलांडून स्वहिता बरोबर देशहित घडवण्यासाठी मस्क्युलर डिस्ट्रॉफीची बालके निश्चितच सरस ठरतील असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सरिता थोरात यांनी केले.
सेवा संकल्प अभियान अंतर्गत मस्क्युलर डिस्ट्रॉफी ग्रस्त रुग्णांसाठी सेवा रुग्णालय कसबा बावडा येथे मोफत आरोग्य तपासणी
शिबीर प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी डीईआयसी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुणाजी नलवडे ,श्रीम फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पल्लवी देशपांडे,मानसशास्त्रज्ञ श्री.मिलिंद यादव ,
जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे बालरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सेवा संकल्प अभियाना अंतर्गत मस्कुलर डिस्ट्रॉफी ग्रस्त रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, प्रयोगशाळा चाचण्या , एक्स-रे, ईसीजी, टूडी इको, कान , नाक, डोळे, दंत, परमनरी फंक्शन चाचणी, तसेच रुग्णाची बोंड डेन्सिटी तपासणी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कार्यक्रमास सेवा रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप वाडकर , डॉ.स्वाती पाटील, जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राच्या व्यवस्थापक श्रीम.मनोरमा सुंजी,सेवा रुग्णालय कसबा बावडा येथील सर्व विभागाचे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी,कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील मस्कुलर डिस्ट्रॉफी रुग्ण तसेच त्यांचे पालक उपस्थित होते.
सूत्र संचालन व आभार श्रीम. वैष्णवी काकडे यांनी केले.
फोटो ओळ:सेवा संकल्प अभियान अंतर्गत मस्क्युलर डिस्ट्रॉफी ग्रस्त रुग्णांसाठी सेवा रुग्णालय कसबा बावडा येथे आरोग्य तपासणी शिबिर उद्घाटन प्रसंगी डॉ.सरिता थोरात व उपस्थितीत सर्व मान्यवर

No comments: