Header Ads

गगनगिरी महाराजांच्या पावन तपोभूमीत शारदीय नवरात्र उत्सवाचा अमृत योग ; ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान कुंकूमार्चन व महिलांच्या हस्ते महाआरती

 गगनगिरी महाराजांच्या पावन तपोभूमीत शारदीय नवरात्र उत्सवाचा अमृत योग ; ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान कुंकूमार्चन व महिलांच्या हस्ते महाआरती 

------------------------------------

कळे प्रतिनिधी

सुनिल मोळे

९८९०९०८०४७

------------------------------------

कळे:- महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेतील थोर सत्पुरुष, हठयोगी आणि नाथ पंथाचे आराध्य दैवत *प.पू. स्वामी गगनगिरी महाराज* यांच्या पावन तपोभूमीत, गगनबावडा येथे शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे.

स्वामी गगनगिरी महाराज हे २० व्या शतकातील एक महान योगी होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गगनगडाच्या कठीण कडेकपाऱ्यांमध्ये घोर तपश्चर्या करण्यात घालवले. जल, वायू, आणि अन्न यांचा त्याग करून केलेली त्यांची साधना आजही भक्तांसाठी प्रेरणादायी आहे. भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक चमत्कार केले, पण त्याहून महत्वाचे म्हणजे त्यांनी माणसाला माणुसकीचा आणि भक्तीचा खरा मार्ग दाखवला. आजही त्यांच्या मठात आलेला कोणताही भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. त्यामुळेच गगनबावडा हे केवळ एक ठिकाण नसून, ते एक जागृत देवस्थान मानले जाते.

 नवरात्राच्या दि. ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या काळात मठात *शारदीय नवरात्र उत्सव, कुंकूमार्चन पूजा व महिलांच्या हस्ते सामूहिक महाआरती* चे आयोजन करण्यात आले आहे.


नवरात्र काळात पवित्र ठिकाणी, *महालक्ष्मी श्री यंत्रावर चंडेश्वरी व महालक्ष्मी देवीच्या सानिध्यात* गगनगिरी महाराजांच्या तपोभूमीत कुंकूमार्चन पूजा करणे हा *अमृत योग* मानला जातो. या पूजेने घरात सुख-शांती, समृद्धी नांदते आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

श्री क्षेत्र गगनगड येथे १० दिवसात कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मालवण, राधानगरी, गोवा परिसरातील नामवंत प्रासादिक भजन मंडळे आपली सेवा रुजू करणार आहेत. 

दि. ११ रोजी ओम साई भजन मंडळ वायंगणी, १२ रोजी स्वरराज छोटा गंधर्व संगीत मंच सांगली, १३ रोजी भोगवे येथील महापुरुष भजन मंडळ, १४ व १५ रोजी भूतनाथ, विठू माऊली, अंबाबाई दत्तपंथी मंडळे, तर १६ ते १८ ऑक्टोबर या मुख्य काळात *भव्य कुंकूमार्चन सोहळा* आणि वारकरी, हनुमान, गुरुमाऊली महिला मंडळांचे भजन होणार आहेत. दि. २० रोजी राधाकृष्ण संगीत विद्यालयाच्या भजनाने उत्सवाची सांगता होईल.


सर्व भाविकांनी या अमृत योगाचा लाभ घ्यावा असे आवाहन मठ समितीचे वतिने श्री. संजय सिंह दादा पाटणकर यांनी केले आहे.

९४२०५८५०४०

No comments:

Powered by Blogger.