Header Ads

शासकीय विश्रामगृहातच तरुणीच्या विनयभंगाचा आरोप; सहाय्यक अभियंत्याविरुद्ध पोक्सोसह गुन्हा दाखल.

 शासकीय विश्रामगृहातच तरुणीच्या विनयभंगाचा आरोप; सहाय्यक अभियंत्याविरुद्ध पोक्सोसह गुन्हा दाखल.

-----------------------------------------

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

 | पी. एन. देशमुख,

-----------------------------------------

मेळघाटातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदऱ्यात शासकीय विश्रामगृहात तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंत्याविरुद्ध चिखलदरा पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज चारथळे (वय ५०, रा. चिखलदरा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहातील रूम क्रमांक ६ येथे ही घटना घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, संशयित अभियंत्याने फिर्यादी तरुणी आणि तिची १७ वर्षीय मैत्रीण यांना फोन करून विश्रामगृहातील खोलीत बोलावले. त्यानंतर फिर्यादीच्या मैत्रिणीला बाहेर जाण्यास सांगून, फिर्यादीशी अश्लील संवाद साधत तिचा हात धरून गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून ७ ऑक्टोबर रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध शासकीय विश्रामगृहातच अशा प्रकारचा आरोप झाल्याने या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश भुजाडे करीत आहेत. प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

No comments:

Powered by Blogger.