महाराष्ट्र राज्य भूजल मत्स्यव्यवसाय सहकारी संघाच्या संचालकपदी कळे येथील राजेंद्र नलवडे यांची निवड ; पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव निवड.
महाराष्ट्र राज्य भूजल मत्स्यव्यवसाय सहकारी संघाच्या संचालकपदी कळे येथील राजेंद्र नलवडे यांची निवड ; पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव निवड.
कळे प्रतिनिधी -
साईश मोळे
९५९५३१६२६६
कळे:- महाराष्ट्र राज्य भूजल मत्स्यव्यवसाय सहकारी संघ, मर्यादित, अकोला या राज्यस्तरीय संस्थेच्या संचालकपदी कळे (ता. पन्हाळा) येथील *राजेंद्र नलवडे* यांची निवड झाली आहे. पुणे विभागीय पश्चिम महाराष्ट्र विभागातून त्यांची एकमेव निवड करण्यात आल्याने कळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजेंद्र नलवडे हे *दि भोईराज फिशरीज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, कोल्हापूर* चे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मत्स्यव्यवसाय आणि सहकार क्षेत्रात त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना ही संधी देण्यात आली आहे.
या निवडीसाठी त्यांना दि भोईराज को-ऑपरेटिव्ह संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच *सुनील काटकर, नामदेव तिकोने, सुनील घाग आणि जी. बी. भोई* यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
राजेंद्र नलवडे यांच्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याची राज्यस्तरीय संघाच्या संचालकपदी निवड झाल्याने कळे परिसरातील सहकार व मत्स्यव्यवसाय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला राज्य पातळीवर प्रतिनिधित्व मिळाले असून भविष्यात या क्षेत्राच्या विकासासाठी त्यांचा अनुभव निश्चितच उपयोगी पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments: