Header Ads

चंद्रेत बंद घर फोडून ४५ हजारांचा ऐवज लंपास!

 चंद्रेत बंद घर फोडून ४५ हजारांचा ऐवज लंपास!

मागील दरवाजाचा आडणा तोडून चोरट्यांचा प्रवेश; सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरीस


राधानगरी | प्रतिनिधी. विजय बकरे 

राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथे बंद घराचे कुलूप नसलेला मागील दरवाजा व आतील आडणा तोडून अज्ञात चोरट्यांनी ४५ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सुशीला संभाजी खाडे (वय ६७) यांच्या घरी १२ ते २० नोव्हेंबरदरम्यान ही चोरी झाली. चोरट्यांनी चांदीचे तोडे, पैंजण, हातातील कडे, अन्नपूर्णा मूर्ती, सोन्याच्या कानातील रिंगा आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खामकर करीत आ

No comments:

Powered by Blogger.