Header Ads

दिवसा घरफोडी करणारी रेकॉर्डवरील महिला जेरबंद; ६५ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त!

 दिवसा घरफोडी करणारी रेकॉर्डवरील महिला जेरबंद; ६५ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त!

बंद घराचे कुलूप तोडून चोरी करताना शेजाऱ्यांनी रंगेहात पकडले; करवीर पोलिसांची धडक कारवाई

करवीर | प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथे दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेला करवीर पोलिसांनी अटक केली. सीमा ऋषिकेश ठाकूर (वय २६, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

२० नोव्हेंबर रोजी दुपारी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून सोन्याची बोरमाळ, लहान मुलांच्या अंगठ्या व रोख रक्कम असा ऐवज चोरी करताना शेजाऱ्यांनी तिला रंगेहात पकडले. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी २१ नोव्हेंबर रोजी महिलेला अटक करून चोरीचा ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी महिला रेकॉर्डवरील सराईत असल्याने तिच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

करवीर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दिवसा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला!

No comments:

Powered by Blogger.