५० टन मका देण्याचे आमिष; कोल्हापुरातील व्यापाऱ्याला ७ लाखांचा गंडा!
५० टन मका देण्याचे आमिष; कोल्हापुरातील व्यापाऱ्याला ७ लाखांचा गंडा!
मका पुरवठ्याच्या नावाखाली ऑनलाइन आर्थिक फसवणूक; शाहूपुरी पोलिसांत राहुल भारतीविरुद्ध गुन्हा दाखल.
कोल्हापूर | प्रतिनिधी
५० टन मका पुरविण्याचे आमिष दाखवून कोल्हापुरातील एका व्यापाऱ्याची तब्बल ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात राहुल भारती याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आमोद प्रभाकर लाटे (वय ५७, रा. महाडीक वसाहत, कोल्हापूर) यांना आरोपीने ५० टन मका पुरविण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान आरोपीने आरटीजीएस व यूपीआयद्वारे वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण ७ लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यांवर वर्ग करून घेतले.
मात्र, पैसे मिळाल्यानंतरही मका पुरवठा केला नाही. तसेच रक्कम मिळाली नसल्याचे कारण सांगून पुन्हा पैसे मागितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लाटे यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेळके मॅडम करीत आहेत.

No comments: