श्रीरामपूर येथे ‘माऊली ॲग्रोनिक’ प्रकल्पाचा थाटात शुभारंभ;शेतकऱ्यांनी बायप्रॉडक्ट्स निर्मिती करणे काळाची गरज:
श्रीरामपूर येथे ‘माऊली ॲग्रोनिक’ प्रकल्पाचा थाटात शुभारंभ;शेतकऱ्यांनी बायप्रॉडक्ट्स निर्मिती करणे काळाची गरज: उपविभागीय अधिकारी मा.आशिष बिजवल
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
श्रीरामपूर,२ नोव्हेंबर २०२६: शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने आजच्या काळात शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीमालाचे बायप्रॉडक्ट्स आणि प्रक्रिया केलेले दर्जेदार पदार्थ बनविणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी मा.आशिष बिजवल यांनी केले. श्रीरामपूरमधील विवेकानंद कॉलनी येथील प्रतापराव पतंगे यांच्या निवासस्थानी आयोजित ‘माऊली ॲग्रोनिक’ शेतकरी बचत गटाच्या नॅचरल फूड प्रॉडक्ट्स विक्री केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.
"शेतकरी हा केवळ अन्नदाता न राहता तो सक्षम उद्योजक झाला पाहिजे," या संकल्पनेला प्रत्यक्षात आणत उपविभागीय अधिकारी मा.आशिष बिजवल साहेब यांच्या प्रेरणेतून व त्यांच्या वेळोवेळी लाभलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे या बचत गटाने उद्योजक होण्याकरिता अत्याधुनिक चिप्सची मशीन तसेच केळाची पावडर व इतर पदार्थ बनवण्याकरिता विशेष ड्रायर मशीन खरेदी केली आहे. याद्वारे कच्च्या केळीपासून संपूर्णपणे नैसर्गिक आणि रासायनिक विरहित घटकांपासून तयार केलेले आरोग्यदायी व स्वादिष्ट चिप्स, चकली,शंकरपाळी,शेव आणि बालुशाही यांसारख्या पदार्थांची विक्री अधिकृतपणे सुरू करण्यात आली असून, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, बेरोजगारांच्या हाताला काम आणि सर्वसामान्यांना आरोग्यदायी उत्पादने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वरील सर्व पदार्थांचा स्टॉल हा आसेगावकर पेट्रोल पंपाच्या बाजूला,हनुमान मंदिराच्या जवळ,श्रीरामपूर पुसद येथे उपलब्ध आहे.आगामी दिवाळी सणासाठी आपण आपल्या फॅमिलीकरिता सुदृढ व आरोग्याची जोपासना करणारे हे नैसर्गिक व रासायनिक विरहित पदार्थ नक्कीच येथून खरेदी करू शकता,असे आवाहन बचत गटातर्फे करण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्याला माजी जि.प.सदस्य शिवाजी देशमुख सवनेकर, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘कृषिभूषण’ पुरस्काराने सन्मानित झालेले मा.दीपक आसेगावकर,तहसीलदार रेखा वाणी मॅडम,मराठा सेवा संघाचे मा. दिगंबर जगताप,तसेच शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांनी शेतीमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास आर्थिक लाभ कसा वाढू शकतो,यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सकाळी १०:०० वाजता उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमास श्रीरामपूर परिसरातील नागरिक,शेतकरी परिवार आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून बचत गटाच्या नवीन उद्योगाला शुभेच्छा दिल्या,तर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन .माऊली ॲग्रोनिक शेतकरी बचत गट व सर्व संचालक मंडळाने केले. यावेळेस माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव,प्रतापराव पतंगे,हरगोविंद कदम,निर्भय बंड्रप,अनंता चतुर,मोनिका जाधव,वनिता पतंगे,दिव्या बंड्रप,मीनाक्षी कदम,कामिनी चतुर, वंदना पतंगे,जयश्री पतंगे,किरण देशमुख,विशाखा बंड्रप,सारिका करेवार,रेखा कंदी,विनिता परतवार,स्वप्निल देशमुख,पंजाबराव टेकळे, मधुकर चव्हाण,आदित्य जाधव,मोहन चतुर, शांतीसागर इंगोले,निखिल पतंगे,ओम कदम,श्रेयश बंड्रप,बाळासाहेब पतंगे,यशवंतराव देशमुख, रामधनी, दिवाकर देशमुख, ओंकार जाधव,आकाश पुंडे, रुपेश येरावर,अविनाश खापरे, तेजस डहाळे,दीपक करेवार,राम जाधव,धनंजय आघाम रेशमा कदम दिगंबर देशमुख अमित हटवार संतोष भेंडे धनंजय कोठाळे सोनू पाटील मोंटू देशमुख प्रभाकर टेटर पत्रकार बंधू व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments: