Header Ads

आळेफाटा हद्दीत चोरीची मोटारसायकल जप्त; एक तरुण रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात

 आळेफाटा हद्दीत चोरीची मोटारसायकल जप्त; एका तरुण रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात .

आळेफाटा, ता. जुन्नर - पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान संशयित मोटारसायकलसह एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी आणे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हा तरुण MH 16 DN 1555 या क्रमांकाची मोटारसायकल घेऊन संशयितरित्या फिरताना आढळला. पथकाने त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव ओंकार भाऊसाहेब वाकळे, वय १९, व्यवसाय शेती मजुरी, रा. पोखरी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर*असे सांगितले.

पोलिसांनी RTO क्रमांकाची पडताळणी केली असता सदर क्रमांकाची गाडी त्याचे वडील भाऊसाहेब एकनाथ वाकळे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. मात्र मोटारसायकलचा चेसिस क्रमांक *MBLHAW082KHJ20251* तपासला असता RTO नंबर आणि चेसिस नंबर जुळत नसल्याचे निदर्शनास आले.

विश्वासात घेऊन विचारले असता ओंकारने सांगितले की, वडिलांच्या नावावरील MH 16 DN 1555 ही गाडी हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीने जप्त केली आहे.

चेसिस नंबरवरून अधिक तपास केला असता सदर गाडीबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २९०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले.

त्यामुळे आरोपी ओंकार वाकळे यास पुढील तपासकामी रांजणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,सहाय्यक फौजदार दिपक साबळे, पोहवा संदीप वारे,राजू मोमीन, अक्षय नवले,अभिमन्यू मोटे यांनी केली आहे.

No comments:

Powered by Blogger.