Header Ads

वाहनाच्या धडकेत सैनिक टाकळीच्या वारकऱ्याचा मृत्यू

 वाहनाच्या धडकेत सैनिक टाकळीच्या वारकऱ्याचा मृत्यू.


(दतवाड प्रतिनिधी :-अर्जुन धोंडीराम धुमाळे)

सैनिक टाकळी पंढरपूर : पंढरपूरला पायी वारीसाठी निघालेल्या सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील वारकरी उत्तम बाबासाहेब पाटील (वय ५४) ठार झाले. मिरज-पंढरपूर मार्गावरील भोसें फाटा (ता. मिरज) येथे रविवारी पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात घडला. वारीच्या वाटेवरच वारकऱ्याचा मृत्यू झाल्याने सैनिक टाकळीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम पाटील हे पंढरपूरच्या वारीसाठी निघाले होते. भोसें फाटा येथे आले असता अज्ञात वाहनाने त्यांना पाठिमागून जोराची धडक दिली. या धडकेत डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. माहिती मिळताच आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

No comments:

Powered by Blogger.