पुसद येथील कु.अंजली अंभोरे ची बीएएमएस करिता निवड.आर्थिक परिस्थितीवर मात करत वैद्यकीय क्षेत्रात घडविला इतिहास.
पुसद येथील कु.अंजली अंभोरे ची बीएएमएस करिता निवड.आर्थिक परिस्थितीवर मात करत वैद्यकीय क्षेत्रात घडविला इतिहास.
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
आर्थिक परिस्थितीवर मात करत वैद्यकीय क्षेत्रात घडविला इतिहास.
पुसद:येथील भीमशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संतोष अंभोरे यांची कन्या कु. अंजली संतोष अंभोरे हिची बीएएमएस या वैद्यकीय पदवीच्या शिक्षणाकरिता नंदुरबार येथे निवड झाल्याने सर्वत्र आनंद उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंभोरे परिवार यांचे नेहमी सामाजिक चळवळीमध्ये निस्वार्थपणे योगदान असते भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हा परिवार गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी निस्वार्थ भावनेने पुढाकार घेत असतो तीच परंपरा जपत कु.अंजली अंभोरे या विद्यार्थिनी आर्थिक परिस्थितीवर मात करत जिद्द व चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश संपादन करून आंबेडकरी समाज तसेच सर्वसामान्य मध्ये एक आदर्श निर्माण केला आहे दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या बीएएमएस या वैद्यकीय शिक्षणासाठी तिची निवड नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी झाली आहे ती आपल्या निवडीचे श्रेय आपल्या गुरुजनांना आई-वडिलांना आजी व मामा यांना देते..
कु.अंजली अंभोरे ही सर्वसामान्य परिवारातून असून तिची आर्थिक परिस्थिती कमकुवत असतांना त्यावर मात करून तिने वैद्यकीय क्षेत्रात नवक्रांती घडवत आदर्श निर्माण केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments: