Header Ads

राजापूर बंधाऱ्यावर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी:राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून पाटबंधारे विभागाला सूचना:

 राजापूर बंधाऱ्यावर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी:राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून पाटबंधारे विभागाला सूचना:


(प्रतिनिधी :- अर्जुन धोंडीराम धुमाळे)

राजापूर (ता. शिरोळ) येथील बंधाऱ्यातील २१ बरगे चोरीच्या घटनेची दखल घेत रविवारी बंधाऱ्याला भेट दिली. बंधाऱ्याची पाहणी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वायरलेस सीसीटीव्ही यंत्रणा बसवून बंधाऱ्यावर कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशा सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

राजापूर बंधाऱ्याचे बरगे बुधवार (दि. ११) अज्ञातांनी चोरले आहेत. सध्या पाण्याची टंचाई, त्यातच बरगे चोरीची घटना घडल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर यड्रावकर यांनी बंधाऱ्याला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बरगे चोरीमुळे पाणीपुरवठा आणि पाणी व्यवस्थापनावर परिणाम होऊ नये, याची दक्षता घेण्याचे आदेश पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिले.

No comments:

Powered by Blogger.