Header Ads

इचलकरंजीतही आढळले डेंग्यूचे रुग्ण

 इचलकरंजीतही आढळले डेंग्यूचे रुग्ण.

(प्रतिनिधी अर्जुन धोंडीराम धुमाळे)

इचलकरंजी शहरामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. चंदूर, कबनूर नंतर आता इचलकरंजीतील डेंग्यूचे रुग्ण दिसू लागल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

शहरालगत असलेल्या चंदूर आणि कबनूरमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. त्यांच्यावर खासगी तसेच आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आता शहरातील जुना चंदूर रोड, कुंभार गल्ली, सूर्य मळा, बागडी गल्ली, आदी परिसरांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर काही भागांमध्ये औषध फवारणी केली आहे. महापालिका प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.थंडीच्या पार्श्वभूमीवर अचानक डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ज्यांना लागण झाली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

No comments:

Powered by Blogger.