श्रीरामनगर वाशीयांचा ग्राम पंचायत निवडणुकीवर बहिष्कार मागण्या पूर्ण न झाल्यास जून्या स्वगावी जाण्याचा निर्णय
श्रीरामनगर वाशीयांचा ग्राम पंचायत निवडणुकीवर बहिष्कार मागण्या पूर्ण न झाल्यास जून्या स्वगावी जाण्याचा निर्णय.
---------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्रजिल्हा प्रतिनिधी गोंदिया
सड़क अर्जुनी तालुक्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील तात्कालीन पुनर्वसित कवलेवाडा, काळीमाती, झलकारगोंदी या गावाचे पुनर्वसन महाराष्ट्र वनसचिव मार्फत प्रकल्प पुनर्वसन अधिकारी तथा उपवनसंरक्षक गोंदिया यांचे सौजन्याने सन 2012 -13 मध्ये करण्यात आले होते. परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आजपर्यंत त्या पुनर्वसन लाभार्थ्यांची आश्वासने पूर्ण झाली नाहीत.
पुनर्वसित कवलेवाडा, काळीमाती झलकारगोंदी सन 2012- 13 मध्ये श्रीरामनगर हे गाव आत्तापर्यंत ऑनलाईन मध्ये समाविष्ट करण्यात आले नाही . बेरोजगार मुलांना व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना खूप अडचण होत असल्याचे दिसत आहे, पुनर्वसित श्रीरामनगर बस स्थानकावर बस स्टॉप वर बस थांबविण्यात यावी, बस स्थानकासमोर हायवे क्रमांक 6 वरील डिव्हाइडर येण्या-जाण्याकरिता तोडण्यात यावा .
सन 2008 मध्ये अमलात आणून गावातील रहिवाशी कुटुंब यादी शेती, झाडे ,घराची किंमत व शेतातील विहीर बोरवेल या रकमेतील वाढ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, आदिवासी जनतेचे पारंपारिक हक्क प्रती कुटुंब व परंपरा यांना न वगळता आम्हाला एक हेक्टर जमीन सहपत्र क्रमांक दोन ,प्रमाणे मूलभूत पर्याय क्रमांक एक मध्ये देऊ असे सर्व जनतेसमोर सांगण्यात आले होते. आदिवासी व पारंपारिक हक्क प्रमाणे आदिवासी कुटुंबाला त्यांची सहमती असल्यानंतर सुद्धा भूमीहीन करण्यात आले नाही, त्यामुळे आमच्या विरोधात शासनाकडे न्यायाची मागणी करू शकता, तुम्हाला पुन्हा पूर्णपणे अधिकार आहे, शेतीचे मूल्यांकन करून शेतीची किंमत, ज्या ठिकाणी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, त्याप्रमाणे शेतीची किंमत देऊ असे सांगण्यात आले होते. परंतु प्रति एकर 65 हजार प्रमाणे देण्यात आले, एक हेक्टर शेती प्रति कुटुंबाच्या नावाने देण्यात यावे, अन्यथा उपजीविके करिता शेती नसल्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
शासनाकडून आम्हाला घर बांधण्याकरिता दिलेल्या प्लॉटवरचा सरकार हा नाव त्वरित हटविण्यात यावा. सन 2012 -13 मध्ये ज्या मुला मुलींचा पुनर्वसन झाला, असे मुलांना पुनर्वसनाचा मोबदला शंभर टक्के मिळण्यात यावा .
कवलेवाडा, कालीमाती, झलकारगोंदी येथील मूळ रहिवासी आहेत किंवा नाही असे लाभार्थ्यांची चौकशी करून असे लाभार्थ्यास पुनर्वसन प्रकल्पाचा प्रमाणपत्र देण्यात यावा. कारण शिक्षण घेत असलेल्या मुलांना योग्य सोयीचे होईल, अतिक्रमण पट्टेधारकांना त्वरित पट्ट्याची जमीन देण्यात यावी, पुनर्वसन गावातील लोकांना बारमाही रोजगाराचा साधन उपलब्ध करून देण्यात यावा, जोपर्यंत श्रीरामनगरवाशी यांना लिखित आश्वासन देत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीला आमचा श्रीरामनगर वाशी यांचा बहिष्कार राहील , येत्या 30 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही श्रीरामनगर वाशी आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे . निवेदन देताना भरत पंधरे, नरेश राहिले, किशोर शेंडे ,प्रभाकर मारवाडे ,ललित शिवणकर ,जागेश्वर वाढवे ,काशिनाथ शिवनकर ,भास्कर कुडापे, नंदलाल नेताम, शामराव कुंबरे, दीपक हेमने ,राजकुमार राहिले, रमेश ब्राह्मणकर ,जागेश्वर चांदेवार ,विलास बागडकर, दिगंबर रहिले, देवचंद सलामे आदी गावकऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून निवेदन तहसीलदार किशोर बागडे सडक अर्जुनी यांना आज ता.26ला दिले आहे
Comments
Post a Comment