जनता शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयांचा क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न.

जनता शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयांचा क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न. ---------------------------------- वाई प्रतिनिधी कमलेश ढेकाणे ---------------------------------- वाई : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर माध्यमिक विद्यालयांच्या ७ शाखांमधील विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारांतील विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धांची सुरूवात दीपप्रज्वलन व संस्था ध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात आली. स्पर्धेचे उदघाटन संस्था सचिव डॉ. जयवंत चौधरी यांचे हस्ते करण्यात आले. उदघाटनप्रसंगी डॉ. चौधरी यांनी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या, डॉ. चौधरी म्हणाले, खेळांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक व व्यक्तिमत्व विकास होतो. विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे व पर्यवेक्षक श्री. अर्जुन...