X5 आंतरराज्यस्तरीय ॲबॅकस स्पर्धा, इचलकरंजी २०२६ मध्ये सांगवडे गावातल्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.
X5 आंतरराज्यस्तरीय ॲबॅकस स्पर्धा, इचलकरंजी २०२६ मध्ये सांगवडे गावातल्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.
---------------------------------------
फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
---------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी- : हातकणंगले येथे झालेल्या पाचव्या आंतरराज्यस्तरीय ॲबॅकस स्पर्धेत सांगवडे येथील विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या बौध्दीक क्षमतेला अधिक चालना मिळावी या उद्देशाने हातकणंगले येथे पाचवी आंतरराज्यस्तरीय ॲबॅकस स्पर्धा नुकतीच पार पडली.यामध्ये सांगवडे येथील ॲबॅकसच्या शिक्षिका निता माने मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली सांगवडे येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये असावरी जिरगे, शब्दा जिरगे, अन्वी पाटिल, श्रेयस माने आणि ध्रुव पायमले, यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले. तसेच सार्थक माने, राजवीर जिरगे आणि वेदांत मोळे यांनी द्वितीय श्रेणीत यश संपादन केले.
ॲबॅकस स्पर्धेत यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षिका निता माने मॅडम यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढावी. या दृष्टीकोनातुन ॲबॅकसचे प्रशिक्षण देवून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. एकाग्रता, कल्पनाशक्ती, अचुकता, श्रवणशक्ती, स्मरणशक्ती, सादरीकरण, गती,आकलनशक्ती हे गुण मुलांमध्ये विकसित होत असल्याचे सांगितले. तसेच या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी करून घेत असल्याचे सांगितले. तसेच पुणे येथे होणाऱ्या नॅशनल लेवल स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल सर्व मुला-मुलींचे हार्दिक अभिनंदन केले.

No comments: