Header Ads

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कुसूंबी येथे अनोखा उपक्रम.

 भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कुसूंबी येथे अनोखा उपक्रम.

------------------------------

 जावली   प्रतिनिधी

 शेखर जाधव

------------------------------

एम. जे. न्यूज चॅनल्सच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप 

सातारा/ जावली :-- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र कुसूंबी येथे देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर दर्शन घडवणारा उपक्रम राबविण्यात आला. कुसूंबी येथील सुपुत्र, मेढा विकास सेवा सोसायटीचे चेअरमन तसेच एम. जे. न्यूज चॅनल्सचे संपादक श्री. जितीन वेंदे आणि सहसंपादक श्री. महेश वेंदे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुसूंबी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

आपण ज्या उत्साहाने धार्मिक सण-उत्सव साजरे करतो, त्याच उत्साहाने राष्ट्रीय सण साजरे करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. अशाच राष्ट्रीय सणांपैकी एक म्हणजे २६ जानेवारी — भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिवशी केवळ ध्वजारोहणापुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रम राबविणे हे खऱ्या अर्थाने देशप्रेमाचे प्रतीक ठरते, आणि हाच आदर्श या उपक्रमातून समाजासमोर ठेवण्यात आला.

नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुसूंबी येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापिका, शिक्षक व पालक यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये शाळेचे माजी विद्यार्थी व एम. जे. न्यूजच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे श्री. जितीन वेंदे यांनी शैक्षणिक उन्नतीचा भाग म्हणून २६ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीने ओळखपत्रे बनवून देण्याची ग्वाही दिली होती.

दिलेल्या शब्दाला जागत, २६ जानेवारीपूर्वीच सदर ओळखपत्रे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुसूंबी येथे सुपूर्द करून श्री. जितीन वेंदे व श्री. महेश वेंदे यांनी शैक्षणिक कार्यात मोलाचा हातभार लावला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, ओळख आणि आत्मविश्वास वाढीस मदत होणार असून समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे.

या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका, कुसूंबीचे सरपंच व उपसरपंच, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष तसेच माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने श्री. जितीन वेंदे व श्री. महेश वेंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Powered by Blogger.