बबनराव शिंदे यांना 'भंते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार' प्रदान,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव.
बबनराव शिंदे यांना 'भंते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार' प्रदान,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव.
-------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
सलीम शेख
-------------------------------
कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनराव सदाशिव शिंदे यांना २०२६ या वर्षीचा 'भंते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. हुपरी येथे आयोजित १० व्या युवा बौद्ध धम्म परिषदेमध्ये हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी सुमित यांच्या हस्ते बबनराव शिंदे यांना मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन युवा बौद्ध धम्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण भोसले, राजाध्यक्ष डॉ. संतोष भोसले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने १८ जानेवारी २०२६ रोजी केले होते.
बबनराव शिंदे हे गेल्या ३० वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. 'शून्यातून विश्व निर्माण करत' त्यांनी संघटनेत मोठी झेप घेतली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रि.पा.ई. चे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा असून, बाबासाहेबांचे विचार जगात प्रज्वलित ठेवण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्नशील असतात.
पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात अनेकवेळा रास्ता रोको, उपोषणे आणि मोर्चांच्या माध्यमातून लोकशाही बळकटीकरणासाठी लढा दिला आहे. भगवान गौतम बुद्धांचे विचारच जगाला तारू शकतात, या श्रद्धेने ते समाजात धम्म प्रचाराचे कार्य सातत्याने करत आहेत.
या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे बबनराव शिंदे यांच्यावरील सामाजिक जबाबदारी अधिक वाढली असून, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असा गौरव झाल्यामुळे तरुण पिढीला सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

No comments: