Header Ads

कणेरीवाडी येथे भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालक फरार.

 कणेरीवाडी येथे भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालक फरार.

-------------------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

 संजय कुंभार 

-------------------------------------------

कोल्हापूर : पुणे-बेंगलोर हायवेवर कणेरीवाडी गावच्या हद्दीत एका भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.  

 मिळालेल्या माहितीनुसार, अमोल नामदेव आयवळे वय ४१, राहणार यशवंत नगर, कणेरीवाडी हे शिरोली पुलाची येथून कामावरून आपल्या मोटारसायकलने क्रमांक MH 09 FH 4240 घरी परतत होते.कणेरीवाडी मनोहर मळा समोरील सर्व्हिस रोडवर एका भरधाव ट्रकने क्रमांक KA 22 B 2547 त्यांच्या दुचाकीला डाव्या बाजूने जोराची धडक दिली.  

या अपघातात अमोल आयवळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक बशीर नझीर अहमद राहणार कर्नाटक याने जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न देता आणि अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी मृताचा भाऊ गणेश आयवळे यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.  

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार अनिता रसाळ करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.