बहादुर शास्त्री दूध संस्थेचे चेअरमन एल. के. खोत यांचे निधन.
बहादुर शास्त्री दूध संस्थेचे चेअरमन एल. के. खोत यांचे निधन.
----------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------
राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील लाल बहादुर शास्त्री दूध संस्थेचे चेअरमन लहू कृष्णाजी खोत (एल. के. खोत) यांचे वयाच्या 80 व्या वर्षी आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रात आणि चांदेकरवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
एल. के. खोत यांनी भोगावती सहकारी साखर कारखान्यात स्टेनोग्राफर म्हणून तब्बल 36 वर्षे निष्ठेने सेवा बजावली. कारखान्याच्या प्रशासनात त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना सहकार क्षेत्रात विशेष मानाचे स्थान मिळाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी लाल बहादुर शास्त्री दूध संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी व दूध उत्पादकांच्या हितासाठी मोलाचे योगदान दिले.
ते गोकुळ दूध संघाचे वरिष्ठ विस्तार अधिकारी राजू खोत यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे उत्तरकार्य सोमवार दि. 2 फेब्रुवारी रोजी चांदेकरवाडी (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथे होणार आहे.
एल. के. खोत यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक अनुभवी, अभ्यासू व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले असून, त्यांच्या कार्याची आठवण कायम स्मरणात राहील, अशी भावना ग्रामस्थ व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

No comments: