Header Ads

मणेराजुरी गावात शेतक-यांनीशक्तीपीठ महामार्गास विरोध दर्शवित मोजणी बंद पाडली.

 मणेराजुरी गावात शेतक-यांनीशक्तीपीठ महामार्गास विरोध दर्शवित मोजणी बंद पाडली.

*******************

कुंभोज प्रतिनिधी 

(विनोद शिंगे)

*******************

शक्तीपीठ महामार्गास संपुर्ण राज्यभर शेतक-यांचा कडाडून विरोध आहे. शेतक-यांनी सर्वच ठिकाणी मोजणी करण्यास विरोध केला आहे. 

   आज मणेराजुरी ता. तासगांव या गावात शेतक-यांनी ठाम विरोध दर्शवित मोजणी बंद पाडली. सरकारने प्रचंड पोलिस बंदोबस्त व दडपशाहीने मोजणी करण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र शेतकरी त्याच एकदिलाने सरकारच्या या हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात लढत आहेत. 

    आज शेतक-यांनी अदानीच्या फायद्यासाठीचा असणारा शक्तीपीठ व देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील ड्रीम प्रोजेक्ट कशापध्दतीने मातीमोल करत आहे यावर भजन गायले किमान आतातरी शेतक-यांच्या भावना मुख्यमंत्र्याना समजाव्यात. शेतक-यांचा विकासाला विरोध नाही.रत्नागिरी नागपूर हा महामार्ग असताना समांतर शक्तीपीठ कशासाठी असा सवाल शेतकरी व नागरीकांच्या मनात आला आहे.  

    केंद्र सरकारचा रत्नागिरी -नागपूर हा महामार्ग तोट्यात असताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास ५० हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीच फडणवीस सरकारकडून केला जात आहे. 

   एकीकडे राज्यातील ठेकेदार यांना केलेल्या कामांची बिले मिळेनात म्हणून आत्महत्या करत आहेत तर दुसरीकडे राज्य सरकार राज्यातील जनतेच्या डोक्यावर८६ हजार कोटीचे कर्ज करून सामान्य जनतेवर टोलरूपी वरवंटा फिरवत आहे.

No comments:

Powered by Blogger.