STP च्या योजनेत समाविष्ट करण्याच्या फुलेनगर ग्रामस्थ्यांच्या मागणीला भाजप चा पाठिंबा.
STP च्या योजनेत समाविष्ट करण्याच्या फुलेनगर ग्रामस्थ्यांच्या मागणीला भाजप चा पाठिंबा.
*******************
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
********************
वाई शहरातील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे सुरु असलेले काम हे फुले नगर परिसरातील सांडपाणी वगळून सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर फुलेनगर चे ग्रामस्थ आज आक्रमक झाले. जमलेले ग्रामस्थ थेट नगरपालिका कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी पोहोचले. त्यांच्या
मागणीला पाठिंबा देण्यासाठी भाजप चे पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा पालिकेत दाखल झाले. STP (सिव्हेज ट्रीटमेंट प्लॅन्ट) च्या योजनेत फुलेनगर परिसरातील सांडपाणी समाविष्ट करून त्यावर प्रक्रिया व्हावी. तसेच सुरु असलेल्या कामाचा दर्जा राखला जावा अशी ग्रामस्थ्यांची आग्रही मागणी होती.
पालिकेत मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना मुंबई मंत्रालयात काम असल्याने मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले. म्हणून चिडलेले ग्रामस्थ व कार्यकर्ते यांनी त्यांच्या दालना बाहेरच ठिय्या मांडला. C O च्या वतीने कार्यालय अधीक्षक गोसावी साहेब व बांधकाम विभागाचे अभियंता प्रभुणे साहेब हे उपस्थितांना सामोरे गेले. याप्रसंगी फुलेनगर ग्रामस्थ व भाजप कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या इमारतीत मुख्याधिकारी केबिन च्या बाहेर जमिनीवर बसूनच अधिकाऱ्यांना धारेवर धरले. STP चे होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असून त्यावर पालिकेचे लक्ष नसल्याची तक्रार तेजस दादा जमदाडे यांनी केली. तसेच फुलेनगर बरोबरच या योजनेतून वगळलेले नावेची वाडी व सिद्धनाथ वाडी परिसराचा काही भाग या योजनेत समाविष्ट करून घ्यावा असे मत शहर अध्यक्ष विजय ढेकाणे यांनी मांडले. या नंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने शेवटी नगरपालिकेचे अधिकारी, सल्लागार, कंत्राटदार व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक फुलेनगर येथे.
Comments
Post a Comment