महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जावळीत महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जावळीत महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

 

 ---------------------------

सातारा प्रतिनिधी

शेखर जाधव

 ---------------------------

 जावली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आदेशानुसार, जावळी तालुका भाजप कार्यकारिणीच्या वतीने मेढा येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास जावळीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात तब्बल 223 रक्तदात्यांनी स्वखुशीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. महिलांचा व तरुणांचा सहभाग लक्षणीय ठरला.

     कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिबिराची पाहणी केली व प्रत्यक्ष उपस्थित राहून रक्तदात्यांचे आभार मानले. "रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, जावळी तालुका सामाजिक भान ठेवून अशा उपक्रमांत पुढाकार घेतो ही गौरवाची बाब आहे", असे मत त्यांनी व्यक्त केले.

           विशेष म्हणजे, ‘माझ्या रक्तदानाच्या वेळी बाबाराजेंनी माझ्यासोबत फोटो घ्यावा’, ही अनेक रक्तदात्यांची छोटीशी इच्छा बाबाराजेंनी पूर्ण करून सर्वांची मने जिंकली.

       शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, युवा नेते सागर धनावडे, सौरभ बाबा शिंदे, भाजप तालुका अध्यक्ष संदीप परामणे, दक्षिण विभाग अध्यक्ष मारुती चिकणे, पांडुरंग जवळ, श्रीहरी गोळे, मचिंद्र क्षीरसागर, विकास देशपांडे, जयदीप शिंदे, शिवाजी गोरे, प्रवीण महाराज शेलार, शिवाजीराव देशमुख, रामभाऊ शेलार, मोहन कासुर्डे, नानासाहेब पवार, संतोष वारागडे, हणमंत शिंगटे, संजय सपकाळ, जितीन वेंदे,सुनिल आण्णा धनावडे,समीर आतार, गीताताई लोखंडे, धनंजय खटावकर, राजू शेलार, सोपान चिकणे, राजू खुडे, संदीप पवार, तसेच विविध गावांचे सरपंच, सोसायटीचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            या रक्तदान शिबिरामुळे जावळी तालुक्याने सामाजिक उत्तरदायित्वाचे दर्शन घडवले असून, यापुढेही असे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



फोटोओळ:_महारक्तदान शिबिरात रक्तदान करताना जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.