बैलगाडी झाली कालबाह्य.

बैलगाडी झाली कालबाह्य.

........................................................

 लेखक.श्री. तानाजी सखाराम कांबळे.

...........................................................

 बदल हा निसर्गाने घालून दिलेला एक जन्मजात अधिकार आहे.आणि तो प्रत्येक माणसाने स्वीकारलेला आहे.

बदलत्या काळाच्या ओघात माणूस,इतका बदलत गेला की, त्याचं बोलणं चालणं वागणं निसर्गाच्या प्रदुषणाच्या बाजूने, इतकं वाढलं की,कोरोना सारख्या संकटाच्या महामारी च्या काळात माणसाला घरातून बाहेर पडणे देखील मुश्किल झालेला आहे.या पाठीमागे जरी अनेक कारणे असली तरी, गरीब शेतकऱ्यांची बैलगाडी,गरीबाची गाडी म्हणून असलेली ओळख एकविसाव्या शतकामध्ये आता  फार कमी प्रमाणात दिसू लागले आहेत.


निसर्गातील पर्यावरणाला वातावरणाला पूरक आणि पोषक अशी असणारी,अपघाताला फार कमी निमंत्रण देणारे,शेतकऱ्याची,बळीराजाची,गरीबाची बैलगाडी आता कालबाह्य होत चाललेली आहे.तिचं दर्शन आता खूप दुर्मिळ प्रमाणात होत चाललेल आहे.एक काळ होता ज्यावेळी शटर बंद टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शनच्या प्रत्येक गावातील एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी असायचे व त्याचे घर गावातील लोकांनी भरलेल असायचं टीव्हीवरची सर्जा राजा मालिका बघण्यासाठी.

प्रामाणिक बैलांच्या प्रेमापोटी बनवले ली सरजा राजा ही दूरदर्शन वरची मालिका, सर्जा राजा हीट झाली होती. 


दोस्तीच्या दुनियेत सपासप पाठीत खंजीर खुपसणारे अनेक नालायक अवलादी ज्या पद्धतीने शेतकऱ्याच्या भाताच्या मळणी भोवती भाताची शिते खाण्यासाठी जमतात,याहीपेक्षा अधिक दोन बैल आपल्या गाडीशी अधिक प्रामाणिकपणे आणि इमानदारीने तहहयात राबत असतात.मालकाने घातलेल्या ओल्या व सुका चारा वरती.


पांढऱ्या रंगाची बैलजोडी काळा रंग असलेली बैलजोडी दिसायला अतिशय आकर्षक असते त्यामुळे एक बैल पांढरा व दुसरा काळा अशी जोडी सरासरी बैलगाडीवाला यांच्याकडे बघावयास मिळते!बैलगाडीतून होणारा शेतात पर्यंतचा प्रवास तसेच दूरच्या अंतरावरती काही कामानिमित्त यापूर्वी बैलगाडीतून होणारा प्रवास अतिशय आल्हाददायक उत्साहवर्धक आनंददायक होता.

घोड्याच्या पायाच्या आवाज सारखा टाप टाप येणारा बैलांचा आवाज, हलत डुलत चालणारी ती बैल गाडीची दोन चाके, शरीराच्या प्रत्येक पार्ट याचा,उत्तमरीत्या व्यायाम करून घेत होती.


फार पूर्वी वाहतुकीची व्यवस्था नव्हती त्यावेळी बैलगाडीला श्रीमंत मानले जात होते.डोंगर माळरानात दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या अनेक गावातील लग्न वराडे यामध्ये बैलगाडीतून नवरीला सजवून लग्नाच्या ठिकाणी नेले जात होते.

तसेच वराडे मंडळीदेखील बैलगाडीतून त्याठिकाणी जात होते.


मी लहान असताना खूप वेळा बैलगाडीने, प्रवास केलेला आहे. आमच्या बैलगाडीतून वडिलांच्या सोबत मी अनेक वेळा चीवाकाठी घेऊन फुलेवाडी येथील पी एन पाटील यांच्या गॅरेजच्या समोरून वाशी नाक्या जवळच्या, चिवा काठी विक्रीच्या अड्डा यावरती  रात घडीला मुक्कामी ठोकून असायचो.

कोल्हापूर येथील वाशी नाक्याजवळ चीवा अड्डा येथे बैलगाडीत रातगडीच्या प्रवासातून दिसणारी रात्रीची विहंगमय कोल्हापूरच्या श्रीमंतीची दृश्य,शहराच्या अनेक बंगल्यावर ती चमचमणाऱ्या रात्रीच्या लायटिंग,त्यावेळी फारच लक्ष वेधून घेत होत्या.


बैल गाडीतून होणारा प्रवास गरीब शेतकऱ्याच्या बैलगाडीला कालबाह्य घेऊन जाणारा ठरलेला आहे.घरोघरी गावोगावी प्रत्येक शेतकऱ्याची दारी बैलाच्या सुंदर अशा आकर्षक जोडी फार पूर्वी पहावयास मिळत होत्या.


मात्र खोट्या श्रीमंतीच्या प्रतिष्ठेपायी

व डामडौल दाखवण्यासाठी शहरावर उपनगराच्या माळावरती बांधलेल्या बंगल्याच्या दारात विलायती चपट्या नाकाची कुत्री महागडी खाद्याने पुरवून सांभाळताना अनेक जण दिसून येत आहेत.राखंदार च्या नावाखाली अशा नालायक अवलादी, दहा गरीब लोकांचे महिना भर पोट भरेल एवढे खाद्यान्न प्रचंड प्रमाणात खर्च करून त्या कुत्र्याला सांभाळून घेताना दिसून येतात.


 शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते शेतकऱ्याचे प्रतीकात्मक स्थिरचित्र हे गरिबी आणि वास्तवाशी निगडित आणि जोडलेल आहे. त्याच्या दारासमोरची त्याची बैलाची जोडी त्याची बैलगाडी ही तर आज कालबाह्य झालेली आहे मात्र,श्रीमंतीचा डामडौल दाखवण्यासाठी धारांमध्ये उभारलेल्या दुचाकी गाड्या चारचाकी गाड्या आज कोणत्या प्रतिष्ठेचं लक्षण मिरवतात हा देखील मनात नकळत पडल गेलेला प्रश्न आहे.


अशा दुचाकी व चारचाकी गाड्या श्रीमंतांच्या चैनीसाठी अपघाताचे निमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत. बदललेल्या काळाचे निमित्त पुढे करून वेळेला गुलाम करून घेणारा माणूस नावाचा प्राणी या गाड्यांच्या नादात आपला जीव कधी घालविल याची खात्री देता येणार नाही आज घडीला.

.........................................................................

 छाया समीक्षा फोटो स्टुडिओ, कोल्हापूर.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.