माजी मंत्री जगदीश गुप्ता अमरावती यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश अमरावतीच्या उभाठा ठाकरे गटाला खिंडार.

 माजी मंत्री जगदीश गुप्ता अमरावती यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश अमरावतीच्या उभाठा ठाकरे गटाला खिंडार.

-----------------------------------

 पी. एन. देशमुख . 

 अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

------------------------------------

 अमरावती. अमरावतीचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्या सह माजी महापौर तसेच३ माजी स्थायी समिती सभापती, विरोधी पक्ष नेता आणि ७ माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूड, कॅप्टन अभिजीत अडसूळ, प्रीती बंड, शिवसेना सचिव राम रेपाळे आदी उपस्थित होते आजच्या पक्षप्रवेशाने अमरावती जिल्ह्यात शिवसेना मजबूत झाली असून उभाठाला खिंडार पडले आहे. माजी मंत्री जगदीय गुप्ता हे दोन विधानसभेचे आणि दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहे. ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांच्यासोबत माजी महापौर नितीन वानखडे, माझी स्थायी समिती सभापती नितीन चांडक, राजू राठी, विलास रोंगे, माजी विरोधी पक्ष नेता सुरेंद्र पोपली यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्याबरोबर मनीष जोशी, सुभाष रत्नपारखी, प्रशांत महाजन, अनिल कडू, भास्कर मानमोड, वासुदेव देऊळकर, डॉक्टर राजेश जयपुरकर या ७ माझे नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अग्रवाल समाजाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष किशोर गोमंतका, खामगाव अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष मनोज खंडेलवाल, मराठा महासंघाचे अमरावती अध्यक्ष गणेशराव रेखे, शाहू समाजाचे अमरावती अध्यक्ष रामचंद्र गुप्ता यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना हा काम करणारा पक्ष आहे लोकांच्या अडचणीला धावून जाणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख आहे. घरी बसून सरकार चालवता येत नाही असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लावला. आजच्या पक्षप्रवेश मुळे शिवसेना अमरावती जिल्ह्यात मजबूत झाली आहे. असे ते म्हणाले. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कल्याणकारी योजना राबवल्या त्यामुळे राज्यातील मतदारांनी महायुतीला ऐतिहासिक बहुमत दिले असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी पालघर जिल्ह्यातील एकता वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष भावेश संख्ये, प्रतीक जोशी, सुमित बारी, मारुती आव्हाड, सोहम राजपूत यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते एकता वाहतूक संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.