नागबर्डी येथे यात्रा उत्साहात : आ. चिखलीकरांनी मानले प्रशासन आणि भाविक भक्तांचे आभार.

 नागबर्डी येथे यात्रा उत्साहात : आ. चिखलीकरांनी मानले प्रशासन आणि भाविक भक्तांचे आभार.

-----------------------------------

नांदेड़ प्रतिनिधी

अंबादास पवार 

------------------------------------

नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या नागबर्डी देवस्थानात काल नागपंचमीनिमित्त भव्य यात्रा भरली होती. या यात्रेमध्ये लाखो भाविकांनी दर्शन घेतले . ही यात्रा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडली असून यात्रा यशस्वी करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी , शासकीय यंत्रणा आणि भाविक भक्तांचे ही आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आभार मानले आहेत.

तालुक्यातील गुंडा बिंडा आणि दिंडा येथील प्रसिद्ध नागबर्डी देवस्थानात नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमानिमित्त बारुळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दि. २९ जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात एकूण २४७ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन माजी आरोग्य सभापती प्रविण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद केंद्रेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश दुलेवाड यांच्यासह आरोग्य विभागातील विविध डॉक्टर्स, अधिकारी आणि सेवक उपस्थित होते. या शिबिरात डॉ. सिदेश्वर मुद्दे, डॉ. अबिका माटोरे, डॉ. दिक्षा कांबळे, डॉ. अंकुश डिगरे, डॉ. श्रृती कौरवार, डॉ. व्यंकटेश मारतळे यांनी तपासणीसाठी विशेष योगदान दिले. तसेच आरोग्य सहाय्यक व्यंकटी शेंळके, बाबाराव यलुरे, अप्पाराव पोले, आरोग्य सेविका जोसना दीघे, अश्विनी कांबळे, अर्चना सोनखेडकर, गिता बोबडे, तसेच आरोग्य सेवक शाहेद पठाण, दिनेश कुलुलवाड, शंकर शेवाळे आदींनी सेवाभावी वृत्तीने शिबिर यशस्वी केले. यात्रेमध्ये पशुसंवर्धन, कृषी विभाग ,आरोग्य विभाग, ग्रामीण स्वच्छता विभाग आदी विभागांचे स्टॉल्स लागले होते. या स्टॉल मधून त्या त्या विभागाची माहिती यात्रेकरूंना देण्यात आली. भाविक भक्तांच्या आरोग्याची ही यावेळी काळजी घेण्यात आली.

दरम्यान नागबर्डी देवस्थानासाठी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यापूर्वीच भरीव असा निधी उपलब्ध करून देऊन येथे भाविक भक्तांना मोठ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिली आहेत. दरवर्षी येथे येणाऱ्या भावी भक्तांची संख्या दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने वाढत असल्यामुळे कोणत्याही भाविक भक्तांना असुविधा होऊ नये त्यासाठीही आमदार चिखलीकर यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी तर लाखोंच्या संख्येने भावीक भक्त येथे उपस्थित झाले होते. तब्बल चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या . याही परिस्थितीत भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .आरोग्य यंत्रणा ही सुरेख काम करत होती. भाविक भक्तही अत्यंत शिस्तीत आणि भक्तिमय वातावरणात या यात्रेमध्ये सहभागी झाली होते . त्यामुळे या सर्वच शासकीय यंत्रणाचे , पोलीस बांधवांचे आणि भावीक भक्तांचेही आ. चिखलीकर यांनी आभार मानले आहेत. यात्रेच्या यशस्वीतेसाठी युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा , दिंडा , बिंडा,लाडका आणि दही कळंबा येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.