कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन: ४२ वर्षांच्या संघर्षाला यश.

 कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन: ४२ वर्षांच्या संघर्षाला यश.

---------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------------

कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील जनतेचा गेल्या ४२ वर्षांपासूनचा संघर्ष आणि प्रतीक्षेची अखेर आज यशस्वी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या हस्ते आज मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन कोल्हापुरात झाले. हा क्षण कोल्हापूरकरांच्या न्याय्य लढ्याचा एक मोठा विजय असून, या उद्घाटन सोहळ्याने न्यायदानाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, खासदार शाहू छत्रपती महाराज, जिल्ह्यातील खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारीही या सोहळ्यात सहभागी झाले होते.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांतील लोकांना आता मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही. सर्किट बेंचमुळे या भागातील लोकांना जलद आणि सोयीचे न्याय मिळेल. यामुळे पक्षकार आणि वकिलांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

या लढ्यात वेळोवेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या क्षणाबद्दल आनंद व्यक्त केला. सर्किट बेंचमुळे कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीला, कायदेशीर पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. हा उद्घाटन सोहळा केवळ न्यायव्यवस्थेसाठीच नाही, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.