कोल्हापुरात शिवसेनेचे राज्य सरकारविरोधात तीव्र निदर्शने.
कोल्हापुरात शिवसेनेचे राज्य सरकारविरोधात तीव्र निदर्शने.
---------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
संस्कार कुंभार
---------------------------
कोल्हापूर : तावडे हॉटेल चौक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्य शासनातील वादग्रस्त मंत्र्यांविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि नेते आमदार सुनील प्रभू व संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले.
उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनाला दिशा मिळाली .सहसंपर्कप्रमुख विजयराव देवणे, राज्य संघटक नवेज मुल्ला, चंगेजखान पठाण, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, रविकिरण इंगवले, सुनील शिंत्रे, वैभव उगळ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलताई चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल मगदूम,सहसंपर्कप्रमुख हाजीअसलम सय्यद यांचीही उपस्थिती होती.या आंदोलनात राज्य शासनातील भ्रष्ट आणि कलंकीत मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली. घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेले शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व इतर अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाने कोल्हापुरात राजकीय वातावरण तापवले.
ही निदर्शने पक्षाच्या जनतेशी असलेल्या बांधिलकीचे प्रतीक ठरली असून, पुढील काळात अशा आंदोलनांची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Comments
Post a Comment