निर्ढावलेल्या विटा पोलीसांकडून वकिलास मारहाण.
निर्ढावलेल्या विटा पोलीसांकडून वकिलास मारहाण.
पोलीस दलाच्या दादागीरीच्या विरोधात काळ्या फिती लावून वकीलाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा.
*****************
शशिकांत कुंभार
*****************
विटा :- सत्तेची धुंदी चढल्याने निर्ढावलेल्या राज्यकर्त्यांच्या दबावात येऊन काम करणाऱ्या पोलीस यंत्रणाही निर्ढावतात. अशा यंत्रणांचा सर्वाधिक फटका हा सर्वसामन्यांना आणि दीन-दुबळ्यांना बसतो. तसाच काहीसा प्रकार विटा येथील कुंभार समाजातील कुंभार वकील कुटूंबाबाबत घडला. बाबतीत . त्यांना चक्क विटा पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. कुंभार कुटुंबाला पोलिसांकडून विनाकारण त्रास दिला जात आहे. रात्री अपरात्री कोणती पोलीस यंत्रणा सामान्य माणसाच्या घरासमोर फेऱ्या मारत दंगा करत बसेल यांचे उत्तर पोलिस अधीक्षक यांनी द्यावे. पोलीस अधीक्षक व विटा पोलीस निरीक्षक यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई केली नाही तर कुंभार समाज रस्त्यावर येऊन आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य काँगेस कमिटीचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी दिली
गेल्या अनेक दिवसांपासून विटा पोलीस स्टेशनचे काही लोकसेवक कर्मचारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विशाल कुंभार यांच्या घराशेजारी असलेल्या एका घरासमोर येऊन मोबाईलवर सेल्फी काढत होते. हे कर्मचारी रात्री अपरात्री मोठ्याने हसणे, गाड्यांचे हॉर्न वाजवणे असे प्रकार करत होते. त्यामुळे कुंभार कुटुंबियांची झोपमोड होत होती म्हणून अनेक वेळा त्यांना शांततेत काम करण्याची विनंती कुंभार कुटुंबातील सदस्य यांनी केली होती.
या बाबत विशाल कुंभार यांनी दिलेली माहिती अशी की.
दिनांक ०२ ऑगस्ट २०२५, रात्री ११:४५ च्या सुमारास ६-७ लोकसेवक असणारे पोलीस कर्मचारी नेहमीप्रमाणे कुंभार वकील यांच्या घरासमोर मोठ्याने हसत आले. तेव्हा विशाल कुंभार यांच्या वडिलांनी पुन्हा त्यांना सांगितले की, “तुमचं काही काम असेल, तर ते शांततेत करा.” त्यावर त्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली आणि म्हणाला, “शेजारी तर तडीपार आहे, तुम्हाला काही कळत नाही का?” त्यावेळी विशाल कुंभार यांनी हस्तक्षेप करून “सकाळी बोलूया” असे सांगितले असता, त्या महिला लोकसेवक कर्मचाऱी यांनी उद्धटपणे “तू आम्हाला काय काम शिकवणार का?” असे म्हणाल्या व वाद घालत लगेचच इतर पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावले.
यानंतर या सर्व लोकसेवक कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला आणि कुंभार वकीलाच्या वयस्क वडिलांना धक्काबुक्की करत विशाल कुंभार यांना एखादा मोठा गुन्हेगार असल्यासारखे उचलून गाडीत टाकले व पोलीस स्टेशनला नेले व त्यांचा मोबाईल देखील त्यांनी हिसकावून घेतला.
पोलीस स्टेशनमध्ये त्यांना रात्री १:३० वाजेपर्यंत बसवून ठेवले. त्यावेळी वरील सर्व घटना त्याच्या घराच्या CCTV मध्ये रेकॅार्ड झालेली आहे हे त्यांचे लक्षात आले नंतर तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमधील सर्व व्हिडिओ डिलीट केले आणि धमकी दिली की, “घरच्या सीसीटीव्ही चा DVR दिलास तरच सोडू, नाहीतर तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करू.” अखेर विशाल कुंभार यांना रात्री २ वाजण्याच्या सुमारास सोडले. त्यानंतर काही पोलीस त्यांच्या घरी येऊन सीसीटीव्ही DVR घेऊन गेले.
गेल्या काही दिवसांपासून विशाल कुंभार यांनी सामान्य नागरिकांच्या तक्रारींबाबत आवाज उठविल्यामुळे पोलिसांनी रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे स्पष्टपणे जाणवते.
----------------------------
पोलिसांनी डी व्ही आर का नेला ?
----------------------------
कोणत्याही गुन्ह्यात विशाल कुंभार याचा सहभाग नसताना त्यांच्या घरांमधील पोलिसांनी सीसीटीव्ही चा डीव्हीआर का नेला याचा तपास वरीष्ठ पोलिस आधीकारी करावा का पोलीसांकडून झालेला अन्याय प्रसार माध्मापासून लपविण्याचा प्रयत्न केला आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे
----------------------------
वकील संघटनेने केला पोलीस प्रशासनाचा निषेध.
----------------------------
विशाल कुंभार यांच्यावर विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली विटा वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी घोषणाबाजी करत दंडाला काळ्या फिती बांधून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विटा पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला यावेळी आक्रमक भूमिका घेतलेल्या वकील बांधवांनी थेट पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या मारला कायदा आणि सुव्यवस्था यांचं कोणत्याही प्रकारचे पालन न करता घटनाबाह्य कृत्य करून विशाल कुंभार व त्यांच्या कुटुंबीयांना दिलेला नाहक त्रास मारहाण धक्काबुक्की शिवीगाळ धमकी याबाबत संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्याविरुद्ध कारवाई करावी अन्यथा आमच्या वकील संघटनेमार्फत योग्यता कायदेशीर मार्गाने योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा विटा वकील संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
Comments
Post a Comment