डेबॉन्स कॉर्नर परिसरातील हॉस्पिटलवर नागरिकांमध्ये चर्चेची जोरदार चर्चा.
डेबॉन्स कॉर्नर परिसरातील हॉस्पिटलवर नागरिकांमध्ये चर्चेची जोरदार चर्चा.
--------------------------
नामदेव भोसले
--------------------------
लिंग निवड तपासणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणामुळे संताप.
शहरातील सोनोग्राफी केंद्रे व हॉस्पिटल्समधील लिंग निवड तपासणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणांवर कारवाईसाठी प्रशासनाने अलीकडेच मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे काही केंद्रांवर धाड टाकून तपासणी केली जात असल्याचे दिसून आले. मात्र, प्रत्यक्षात अजूनही काही ठिकाणी अनियमितता सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
डेबॉन्स कॉर्नर परिसरात असलेल्या पाटील नावाच्या एका डॉक्टरांचे हॉस्पिटल भाडेतत्त्वावर देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्या ठिकाणी छोट्याशा ऑपरेशन थिएटरमध्ये गुप्तपणे गर्भनिदान करून, तब्बल १ लाख रुपये घेऊन बेकायदेशीर गर्भपात केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. इतक्या उघडपणे हा प्रकार सुरू असूनही प्रशासनाने अद्याप कारवाई का केली नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
काही नागरिकांनी उपरोधिक भाषेत प्रतिक्रिया देताना म्हटले की – “शांती तू नहीं जानती, चाय पे बुलाती है और शराब पिलाती है” अशा पद्धतीने हे रुग्णालय चालवले जात असून, प्रशासनाने डोळेझाक केली आहे का, अशी चर्चा शहरभर रंगली आहे.
दरम्यान, सरकारी यंत्रणेने अलीकडेच एका कारवाईदरम्यान पहाटे ५ वाजता संबंधित हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांच्या फाईल्स ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या फाईल्सची तपासणी करून त्यामधील नोंदींचा आढावा घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या तपासणीचे निष्कर्ष अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.
शहरात सतत वाढत असलेल्या गर्भपाताच्या प्रकारांमुळे आणि मुलींच्या संख्येत होत असलेल्या घटेमुळे समाजातील सुज्ञ नागरिक चिंतेत आहेत. “अशा बेकायदेशीर प्रथांना आळा बसला नाही, तर मुलगा-मुलगी प्रमाणाचा ताळमेळ अधिकच बिघडेल,” असे मत काही सामाजिक संघटनांनी व्यक्त केले आहे.
या सर्व प्रकरणामुळे डेबॉन्स कॉर्नर परिसरातील संबंधित हॉस्पिटलवर संशयाचे सावट गडद झाले असून, प्रशासन आता कितपत तातडीने व कठोर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments: