मुरगूडमधे प्रथमच १ लाखाच्या मंडलिक प्रेमी दहिहंडीचा थरार.
मुरगूडमधे प्रथमच १ लाखाच्या मंडलिक प्रेमी दहिहंडीचा थरार.
----------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
----------------------------
मुरगूड येचील कन्या शाळा पटांगणावर मंडलिक प्रेमी समर्थक मुरगूड आणि शिवसेनेच्या वतिने दहिहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता मंडलिक प्रेमी दहिहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल अशी माहिती संयोजन कमीटीने पत्रकार परिषदेत यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरिक्षक मा. विरेंद्रभैया मंडलिक , संयोजन कमीटी सदस्य उपस्थित होते.
कागल तालुक्यातील पहिली मानाची मंडलिक प्रेमी दहिहंडीच्या स्पर्धेतील १ लाख रूपयाचे रोख बक्षिस पटकावण्यासाठी गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे माजी खासदार मा. संजयदादा मंडलिक व पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरिक्षक मा. विरेंद्रभैया मंडलिक यांच्या मार्गदर्शना खाली हि स्पर्धा पार पड़नार आहे तसेच या स्पर्धेकरीता प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्याचे पालकमंत्री मा. प्रकाशरावजी आबिटकर, माजी खासदार मा. संजयदादा मंडलिक, मा. आमदार राजेश क्षिरसागर, मा. आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार जयश्रीताई जाधव, मा. सत्यजित उर्फ नाना कदम व शारंगधर देशमुख, मा. सुजीत चव्हाण यांच्यासह जिल्यातील शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. मंडलिक प्रेमी दहिहंडी स्पर्धेमधील विजेत्या संघाला १ लाख रूपयाचे पारितोषीक दिले जाईल तर स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. पहिल्याच प्रयत्नात सहा चर लावून सलामी देणा-या गोविंदा पथकाला ११ हजार रूपयाचे पारितोषीक दिले जाणार आहे. सदर स्पर्धेचे सर्व नियोजन सार्थ सागर फौंउंडेशन यांच्या मार्फत होणार आहे. तसेच वरच्या चरावर चढुन दहिहंडी फोडणा-या गोविंदाच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय केले जातील. त्यासाठी समीट अॅडव्हेंचरचे विनोद कंबोज आणि हिल रायडर अॅडव्हेंचर यांचे विशेष सहकार्य आहे. शिवाय एखादा गोविंदा जखमी झाल्यास त्याच्यावर तत्परतेने उपचार करण्यासाठी ग्रामीण रूग्णालय मुरगूड व मुरगूड नगरपरिषद यांच्या रूग्णवाहिकासह डॉक्टराचे पथक सज्ज असेल दहिहंडी फोडणारा सर्वात वरच्या धरावरील गोविंदा १४ वर्षावरील असावा या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. तर सर्व गोविदांना १० लाख रूपया पर्यंतचे अपघाती विमा कवय असनार आहे. यावेळी रिल्स स्पर्धाही आयोजीत केल्या आहेत. सर्वोत्कृष्ठ रिल्सला अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रूपयांचे पारितोषीक दिले जाईल. शासनाने दहिहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, माजी नगरसेवक एस. व्हि. चौगले, सुहास खराडे, दत्ता मंडलिक, संयोजक विनोद चौगले, अरुण मेंडके, देवेन राऊत, मयुर आंगज, संग्राम डवरी, विराज रनवरे, अनिकेत बेनके आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment