वाळवा गावात ‘राणी’ शेळीचा ओटीभरन सोहळा पारंपारिक पद्धतीने.
वाळवा गावात ‘राणी’ शेळीचा ओटीभरन सोहळा पारंपारिक पद्धतीने.
------------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
------------------------------
वाळवा तालुक्यातील वाळवा गावात इंदुताई चंद्रकांत पेशवे यांच्या घरातील ‘राणी’ नावाच्या शेळीचा ओटीभरन सोहळा पारंपारिक आणि आदर्श पद्धतीने संपन्न झाला. या अनोख्या कार्यक्रमात राणी शेळीला साडी, चोळी आणि खन नारळाने ओटीभरन करण्यात आले.
सोहळ्यावेळी पारंपारिक पदार्थांचा मेजवानीसारखा आस्वाद देण्यात आला, ज्यामध्ये केळी, खाजा, बालुशाही, दहिभात, सांजाची पोळी, थापीव वड्या यांचा समावेश होता. गावातील महिला, विशेषतः सुहासिनींना खास आमंत्रित करून वातावरण उत्साही आणि मंगलमय बनविण्यात आले.
इंदुताई पेशवे यांना शेळीपालनाचा अनेक वर्षांचा अनुभव असून, ‘राणी’ शेळीवर त्यांचे विशेष प्रेम आहे. हाच जिव्हाळा आणि आपुलकी या ओटीभरन सोहळ्यातून स्पष्टपणे जाणवला.
या उपक्रमाद्वारे वाळवा गावात पारंपारिक शेळीपालनाचा नवा आदर्श प्रस्थापित झाला आहे. अशा पद्धतीमुळे पशुपालनास सामाजिक प्रतिष्ठा मिळून आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर व्यवसायाला सांस्कृतिक रंग चढणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
No comments: