कागलमध्ये उर्दू शाळेसाठी जागा मंजूर, नागरिकांचा .
कागलमध्ये उर्दू शाळेसाठी जागा मंजूर, नागरिकांचा.
-------------------------------
सलीम शेख
-------------------------------
कागल : कागल येथील पंडित जवाहरलाल उर्दू मराठी शाळा आणि कब्रस्थान बचाव कमिटी यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे. शासनाने उर्दू शाळेसाठी जागा मंजूर केली आहे, त्यामुळे लवकरच शाळेची प्रशस्त इमारत उभी राहणार आहे. या निर्णयामुळे आनंदित झालेल्या नागरिकांनी शाळेतील मुलांना साखर पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी कमिटीचे अध्यक्ष समिर नायकवडी यांनी कागलमधील जनतेला आपल्या मुलांना उर्दू मराठी शाळेत प्रवेश देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सर्व समाजाच्या सहकार्यामुळेच हे यश मिळाले आहे. उर्दू मराठी शाळेला जागा मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या कागल आणि कागल तालुक्यातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे, विविध संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, राजकीय नेते आणि प्रशासनाचे त्यांनी आभार मानले.
या प्रसंगी समितीचे सदस्य रशिद नायकवडी, अस्लम मकानदार, फारूख अलासकर, बाळासो नाईक, सरदार नायकवडी, अबिद सरखवास, हिदायत नायकवडी, लियाकत मुल्लाणी, निहाल तहसिलदार, रमजान नदाफ, सुलेमान नायकवडी, फिरोज पट्टेकर, आब्बास नायकवडी, नासीरखान (राजू) नायकवडी, नूर भाई सांगाव आणि इतर अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सकारात्मक निर्णयामुळे कागलमध्ये शिक्षणाचा विकास होण्यास मदत मिळेल.
Comments
Post a Comment