वसगडेच्या लोकनियुक्त सरपंचासह ग्रामपंचायतीची बदनामी करून धमकी दिल्या प्रकरणी आरटीआय कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल.
वसगडेच्या लोकनियुक्त सरपंचासह ग्रामपंचायतीची बदनामी करून धमकी दिल्या प्रकरणी आरटीआय कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल.
------------------------------
शशिकांत कुंभार
------------------------------
गांधीनगर:- वसगडे गावातील घनकचरा प्रकल्पाचे व्हिडिओ चित्रण करून गावच्या लोकनियुक्त सरपंचासह ग्रामपंचायतीवर बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप करत ते सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केल्या प्रकरणी आरटीआय कार्यकर्ता सुरज आप्पासो गवळी (रा . वसगडे ता.करवीर) याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद लोकनियुक्त सरपंच योगिता तेजस बागडी रा वसगडे यांनी दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती वसगडे ग्रामपंचायत मध्ये एकूण 14 सदस्य पैकी 11 सदस्य महिला आहेत. 15 ऑगस्ट 25 रोजी पासून ते 6 सप्टेंबर पर्यंत संशयीत सुरज गवळी हा वारंवार ग्रामपंचायत मध्ये येऊन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना तुम्ही ग्रामपंचायत मध्ये टाईमपास करता गावची कामे करत नाही असं वक्तव्य करत धमकी देत आहे. तसेच जिल्हा परिषद मधून मंजूर झालेल्या घनकचरा प्रकल्पात कोणताही भ्रष्टाचार झाला नसतानाही वारंवार ग्रामपंचायत मध्ये येऊन तुम्हाला मी कोण आहे हे दाखवतो. अशी धमकी देत असून सरपंचासह पदाधिकाऱ्यांची नाहक त्रास देत आहे. त्यामुळे चांगले काम सुरू असतानाही ग्रामपंचायतची तसेच पदाधिकाऱ्यांची
सोशल मीडियावर बदनामीचे मजकूर प्रसिद्ध करत आहे. या कारणावरून सुरज आप्पासो गवळी याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे करीत आहे.
Comments
Post a Comment