Header Ads

शिरोळ पोलिसांची धडक कारवाई : ११ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त.

 शिरोळ पोलिसांची धडक कारवाई : ११ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त.

--------------------------------

शिरोळ  प्रतिनिधी

नामदेव भोसले

--------------------------------

शिरोळ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत चोरीस गेलेली मोटारसायकल व तब्बल अकरा लाख रुपयांची JCB हस्तगत केली आहे. या प्रकरणी एका सराईत चोरट्याला अटक करण्यात आली असून, पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.संशयित मोटारसायकलमुळे पोलिसांची शंका

दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी शिरोळ पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार KA-32-EF-4429 या क्रमांकाची मोटारसायकल चालवणारा एक इसम संशयित अवस्थेत दिसून आला. चौकशी केली असता सदर मोटारसायकल ही चोरीची असल्याचे समोर आले.

 नबीश सनाळ (वय ३४, मूळ रा. भैरववाडी, ता. देवगिरीप्पुरी, जि. विजयपूर, कर्नाटक. सध्या रा. नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर)असे सांगितले. त्याने चौकशीत कबुली देताना शिरोळ व परिसरातून मोटारसायकल तसेच इतर वाहने चोरी केल्याचे उघड केले.हिरो स्प्लेंडर एक्स मोटारसायकल (क्र. MH-10-BS-1840) – किंमत ₹१५,०००/-

J.C.B 3 DX 2 WDSS (क्र. KA-22-P-4487, इंजिन क्र. 4H22951034839, चेसिस क्र. 1719993, मॉडेल 2011) – किंमत ₹११,००,०००/- एकूण जप्त मुद्देमाल किंमत : ₹११,१५,०००/-

या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गु.र. नं. २१५/२०२५, भा.दं.सं. कलम ३०२ [२] प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कारवाईतील अधिकारी व कर्मचारी

या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्री स़ंजय. नाईक, पोलीस हवालदार 

बाबा चांद पटेल, आदींचा विशेष सहभाग होता. संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

No comments:

Powered by Blogger.