कागलमधील दुकानदार, व्यावसायिकांसाठी दिवाळी आणि उरुसाच्या पार्श्वभूमीवर फसवणुकीपासून सावध राहा!
कागलमधील दुकानदार, व्यावसायिकांसाठी दिवाळी आणि उरुसाच्या पार्श्वभूमीवर फसवणुकीपासून सावध राहा!
***********************
सलीम शेख
***********************
कागल : कागल शहरात सध्या दुकान आणि घरांमध्ये मदतीच्या नावाखाली येणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली असून, त्यांच्याकडून होणाऱ्या चलन फसवणुकीच्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः आगामी दिवाळी सण आणि कागल उरुस या काळात अशी गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने, दुकानदार आणि व्यावसायिक यांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.
सध्या काही महिला लहान मुलांना सोबत घेऊन दुकानात येत आहेत. मदतीच्या नावाखाली किंवा वस्तू खरेदीच्या बहाण्याने त्या व्यापाऱ्यांचे लक्ष विचलित करत आहेत. अलीकडेच दुपारी १ वाजता एका दुकानात आलेल्या महिलेसोबत अशाच प्रकारची घटना निदर्शनास आली. या महिलेने कडेवर बाळाला साडीच्या पदराखाली झाकले होते, तर तिच्यासोबत असलेल्या लहान मुलीच्या हातात दोन ५० रुपयांच्या नोटा होत्या. अशा वेळी मदतीच्या नावाखाली भावनिक साद घालून किंवा गडबडीचा फायदा घेऊन बनावट किंवा फाटलेल्या नोटा व्यवहारात आणल्या जाण्याची शक्यता आहे.
कागल शहरातील सर्व दुकान मालक, व्यावसायिक आणि
कोणताही व्यवहार करताना, विशेषतः नोटांची देवाणघेवाण करताना, गडबड न करता प्रत्येक नोट नीट तपासावी.मदतीसाठी किंवा चिल्लरच्या नावाखाली आलेल्या नोटा बनावट (नकली) तर नाहीत ना, याची खात्री करून घ्या.दिवाळी, उरुस यांसारख्या गर्दीच्या काळात किंवा जास्त व्यवहार असलेल्या वेळेत आपली सतर्कता वाढवा.
लगेच पोलिसांना कळवा.जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीच्या हेतूवर शंका वाटली किंवा बनावट नोटा देण्याचा प्रयत्न झाला.अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आणि व्यापाऱ्यांनी सतर्क राहावे. कोणत्याही संशयास्पद व्यक्तीबद्दल किंवा व्यवहाराबद्दल माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस चौकीत कळवावे.
आपला मौल्यवान वेळ आणि पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी, नोटा घेताना 'बघून घ्या' हा नियम कटाक्षाने पाळा.
No comments: