भीषण अपघातात दोघे ठार; जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल.
भीषण अपघातात दोघे ठार; जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल.
************************
सुपर भारत- शशिकांत कुंभार
*************************
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गावर चिपरी फाटा येथे शुक्रवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
या अपघातात संतोष शंकर विटेकर (वय ३७, रा. खोतनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) आणि मोहम्मद हंजाल आताऊल्लाह आलम (वय २१, सध्या रा. आवाडे पार्क, हातकणंगले, मूळ गाव बिहार) या दोघांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास संतोष विटेकर आणि त्याचा मित्र मोहम्मद हंजाल आलम हे त्यांच्या मोपेड दुचाकीवरून जयसिंगपूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. याच वेळी चुकीच्या दिशेने आलेल्या बुलेट दुचाकीने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली.
या धडकेत संतोष विटेकर आणि मोहम्मद हंजाल आलम हे दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना तात्काळ जयसिंगपूर आणि त्यानंतर सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेनंतर मृतांपैकी एकाचे नातेवाईक शंकर आप्पू विटेकर (रा. कळंबी, ता. मिरज) यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या बुलेटचालक संमेत कुरडे याच्याविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंगपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments: