डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी अनेक कल्याणकारी धोरण राबविले; स्नेहा टोम्पे!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी अनेक कल्याणकारी धोरण राबविले; स्नेहा टोम्पे!
----------------------
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी.
------------------------
पुसद: प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद प्रबोधन पर्व २०२६ यांच्या वतीने दिनांक १६एप्रिल ते १९ एप्रिल पर्यंत गायन व प्रबोधन विद्यार्थ्यासाठी स्पर्धा मार्गदर्शनाचे व महिलांसाठी प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले.
या मध्ये शेवटचे पुष्प १९ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला विषयी कल्याणकारी धोरण या विषयावर प्रबोधन करण्यासाठी प्रमुख वक्त्या स्नेहा टोम्पे,अमरावती यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात संभाजीनगर येथील लुंबिनी महिला मंडळ यांच्या वतीने त्रिनयना व बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड.मोहिनीताई नाईक यांच्या सह उपस्थित महिलांनी बुद्ध,शिव,फुले, शाहू,आंबेडकर, अशोक सम्राट या महामानवाच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड मोहिनीताई नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव प्रबोधनपर्व समितीच्या उद्घाटना मी दिवशी हजर राहू शकलो नाही परंतु पुढील वर्षी मी तुमच्यासोबत राहणार असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून जाहीर केले.
व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर प्रमुख वक्त्या स्नेहा टोम्पे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला विषयी कल्याणकारी धोरण या विषयावर आपल्या व्याख्यानाला सुरूवात करून उपस्थित महिलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.
१९५० पूर्वी महिलांना जे समाजातून बंधने होती ती बंधने बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून तोडून सर्व महिलांना स्वतंत्र जगण्याचा अधिकार दिला, तसेच हिंदू कोड बिल, कोळसा कामगारांना खानीतील महिलांना मजुरांना त्यांच्या भविष्याबद्दल सुरक्षा कवच, प्रशासनात नोकरीदार असलेल्या महिलांना प्रसूती पगारी रजा, आई-वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा, तसेच पूर्वी एक पुरुष अनेक बायका करत असे परंतु संविधानातील कायद्याच्या नियमानुसार एक पुरुष एक महिला त्या पुरुषाला दुसरे लग्न करण्यासाठी अगोदर फारकत नामा व तिची पोटगी द्यावी लागेल नंतरच तो दुसरे लग्न करू शकेल अशी महिला विषयी अनेक धोरण राबवून संविधानात हक्क अधिकार प्रदान करून दिले त्या बाबासाहेबांना महिलांनी दररोज धन्यवाद, थँक्यू, बाबासाहेब म्हणलं पाहिजे अशा धारदार आपल्या वाणीतून स्नेहा टोम्पे यांनी प्रबोधन केले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची व कामाची जाणीव करून दिली.
यावेळी कार्यक्रमाला मंचावर उपस्थित..नायब तहसीलदार मायाताई ठोके, केंद्रीय मुख्याध्यापिका ललिताताई खडसे, नगरसेविका दिपालीताई जाधव, नगरसेविका शिल्पाताई देशमुख, माजी मुख्याध्यापिका तिलोतमाताई सोमकुवर, महिला व बालकल्याण सभापती अश्विनीताई जिल्हेवार, नगरसेविका जयश्रीताई दुधे, समाजसेविका वर्षाताई वैद्य, तलाठी नेहाताई खंदारे, नेहाताई राहुल भगत,इत्यादी सक्षम महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा भगत यांनी केले तर आभार प्रदर्शन मंदाताई आघम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबोधनपर्व आयोजन समिती पुसद २०२६ चे सर्व सदस्य तसेच उपासक,उपासीका तसेच महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments: