गांधीनगरपर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची तपासणी करा - आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड.
गांधीनगरपर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची तपासणी करा - आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड.
----------------------------
शशिकांत कुंभार.
------------------------------
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या गांधीनगरपर्यंतच्या हद्दीतील जागा महानगरपालिकेचीच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या जागेवरील सर्व बांधकामांची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश दिले.
याबाबत आज निवडणूक कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-शहर रचनाकार एन. एस. पाटील तसेच अभियंता व सर्व्हेअर उपस्थित होते. बैठकीत शुक्रवार दि. 24 एप्रिल 2026 पासून गांधीनगर पर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीतील उचगांव महसूली गावांतील सर्व्हेनंबरातील सर्व बांधकामांची सखोल तपासणी करण्याचे निश्चित करण्यात आले. सदर तपासणी सकाळी 10.30 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार असून यासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये नगररचना विभाग, विभागीय कार्यालय क्र. 4, घरफाळा विभाग तसेच परवाना विभागातील कर्मचारी सहभागी राहणार आहेत. या मोहिमेत संबंधित जागेवरील सर्व इमारतींची मोजमापे करून बांधकामांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच घरफाळा व परवाना विभागामार्फत आवश्यक नोंदींची छाननीही करण्यात येणार आहे.

No comments: