Header Ads

साजणीतील कारवाई — कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचा मोठा धडक छापा; बनावट एचएसआरपी नंबर प्लेट रॅकेट उघड.

 साजणीतील कारवाई — कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचा मोठा धडक छापा; बनावट एचएसआरपी नंबर प्लेट रॅकेट उघड.

--------------------------------------

संस्कार कुंभार

---------------------------------------

दि. १३ फेब्रुवारी २०२६ | साजणी (ता. हातकणंगले)

कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व हातकणंगले पोलिसांनी संयुक्त कारवाई करत साजणी येथील श्री साई रेडीयम आर्ट्स या दुकानावर छापा टाकून बनावट एचएसआरपी नंबर प्लेट तयार करणारे रॅकेट उघड केले. या कारवाईत सुमारे ४ लाख ६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संतोष बबन यादव (वय ३१) याच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गोपनीय माहितीनुसार कारवाई करताना आरोपी शासन अथवा महाराष्ट्र मोटार व्हेइकल डिपार्टमेंट यांची अधिकृत परवानगी नसताना एचएसआरपी नंबर प्लेट तयार करत असल्याचे आढळून आले. आरोपी बनावट नंबर प्लेट तयार करून वाहनधारकांना ती खरी असल्याचा भास निर्माण करत पैसे उकळत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

छाप्यात एम्बॉस मशीन, फाईल हिटर मशीन, ३३ एचएसआरपी प्लेट, १३२ काळ्या व १८२ पांढऱ्या डाय, ४०२ स्टिकर्स, INDIA प्लास्टिक रोल, चलनी नोटा व मोबाईल हँडसेट असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार, अण्णासाहेब जाधव, डीवायएसपी अमोल ठाकूर तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

👉 साजणी परिसरात झालेल्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर नंबर प्लेट तयार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.