प्रथितयश कवयित्री व लेखिका सौ.अनिता बर्गे-भोसले यांचा नव्या धाटणीचा कवितासंग्रह प्रकाशनास सज्ज*
प्रथितयश कवयित्री व लेखिका सौ.अनिता बर्गे-भोसले यांचा नव्या धाटणीचा कवितासंग्रह प्रकाशनास सज्ज*
----------------------------------
कुडित्रे प्रतिनिधी
---------------------------------
कोल्हापूर : कोल्हापूर येथील कवी सरकार वाचनालय इंगळी यांच्यातर्फे सातारा येथे आयोजित सत्ताविसाव्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये साता-याच्या लेखिका व कवयित्री सौ.अनिता प्रविण भोसले-बर्गे यांचा ' काव्य संस्कार' हा दुसरा काव्यसंग्रह येत्या १ मार्च २०२६ रोजी प्रकाशित होत आहे.
वयाच्या अवघ्या ३२ साव्या वर्षी सौ.भोसले यांचा प्रकाशित होणारा हा दुसरा काव्यसंग्रह इतर काव्य संग्रहांपेक्षा वेगळ्या धाटणीचा आहे.सौ.अनिता भोसले-बर्गे मॅडमना कमी वयात विविध साहित्य समुहांद्वारे तसेच संस्थाद्वारे सुमारे ५५ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.शिवाय विविध काव्य समूहांद्वारे आयोजित काव्यस्पर्धांमध्ये सुयश मिळाले आहे.
त्यांच्या या आगामी काव्यसंग्रहामध्ये त्यांचे सासर व माहेरचे नातेवाईक,त्यांचा अफाट मित्र परिवार, मार्गदर्शक गुरू व निसर्ग आणि सर्वात महत्वाचे त्यांची श्रद्दा असलेले श्री स्वामी समर्थ या सर्वांवर त्यांनी विविधांगी व आशयपूर्ण कविता लिहील्या आहेत.त्या कविता व त्यांसाठी समर्पक छायाचित्रे यांची सुरेख मिलाफ या त्यांच्या नव्या काव्यसंग्रहात जाणवून येतो.
मसूर ता.उंब्रज सारखे दास मारूतीचे अधिष्ठान लाभलेले गांव त्यांचे माहेर तर राजधानी सातारा हे त्यांचे सासर आहे.दोन्ही घरच्या नातेवाईकांच्या पाठबळावरच सौ.अनिता भोसले-बर्गे यांची साहित्यिक कारकीर्द वाढीस लागली आहे.संपूर्ण महाराष्ट्र भर त्यांची मित्र परिवार मोठा आहे.त्या सातत्याने साहित्यिक व सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी असतात.
या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी रयत शिक्षण संस्थेचे शिवाजी कॉलेज,सातारा येथे रविवार १ मार्च रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: