Header Ads

महाराष्ट्रातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदली; कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत बदल.

 महाराष्ट्रातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदली; कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत बदल.



-------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

संस्कार कुंभार 

--------------------------------

मुंबई, दि. २० एप्रिल २०२६ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली व पदस्थापनेबाबत महत्त्वाचा शासन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पोलीस प्रशासनात बदल करण्यात आले असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही पावले उचलण्यात आली आहेत.

जारी आदेशानुसार तुषार दोशी यांची सातारा येथून सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. निखिल पिंगळे यांची पुणे येथील पोलीस उपआयुक्त पदावरून सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सांगलीचे विद्यमान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपआयुक्त (सुरक्षा) म्हणून बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाली असून त्यांना अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एम. रमेश यांची गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.

याशिवाय महेश्वर रेड्डी यांची जळगाव येथून राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली करण्यात आली असून श्रीकांत दिवरे यांची धुळे येथून जळगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे. राजकुमार शिंदे यांची पुणे येथून वाशिम येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

गृह विभागाने पोलीस महासंचालकांना या आदेशानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

No comments:

Powered by Blogger.