Header Ads

कुपवाडमध्ये दुहेरी खळबळ; दोन वेगवेगळ्या घटनांत दोन खून, परिसरात भीतीचे वातावरण

 कुपवाडमध्ये दुहेरी खळबळ; दोन वेगवेगळ्या घटनांत दोन खून, परिसरात भीतीचे वातावरण.

---------------------------------

 सांगली / कुपवाड प्रतिनिधी :

राजू कदम .

---------------------------------

कुपवाड परिसरात सलग दोन खूनाच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली असून एका प्रकरणात पत्नीने साथीदारासह पतीची हत्या केली, तर दुसऱ्या घटनेत जुन्या वादातून मित्रांनी तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सविस्तर बातमी :

एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात दोन्ही प्रकरणांत खूनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत (गु.रजि. नं. 84/2026) बीएनएस कलम 103(1), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादी सुरज दगडू केंगार (वय 24, रा. कुपवाड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. दि. 5 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान कापसे प्लॉट येथील अलंकार कॉलनीत दत्तात्रय आळगीकर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना घडली. मयत दगडू सुखदेव केंगार (वय 52) हे झोपेत असताना त्यांच्या पत्नी छबुताई केंगार हिने “पती दारू पिऊन वारंवार त्रास देत होते” या कारणावरून ओळखीतील शाहरुख फारुख मकानदार याच्यासोबत संगनमत केले. दोघांनी चाकूने पाय, पाठ व डोक्यावर वार करून त्यांचा खून केला.

दुसऱ्या घटनेत (गु.रजि. नं. 85/2026) बीएनएस कलम 103(1), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रूपाली महादेव अपराज (वय 41, रा. बामनोली, कुपवाड) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. दि. 6 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता बामनोली परिसरात ही घटना घडली. मयत सचिन महादेव अपराज (वय 23) याचा आरोपी रोहन उर्फ शुभम वाघमोडे व सुनील दुधाळ यांच्यासोबत चार दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादातून दोघांनी कुराड व फावड्यासारख्या हत्याराने सचिनवर डोक्यावर व तोंडावर वार करून त्याचा खून केला.

दोन्ही घटनांनंतर अनुक्रमे दि. 6 एप्रिल व 7 एप्रिल रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुढील तपास :

दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस करत असून आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सलग दोन खूनाच्या घटनांमुळे कुपवाड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.