Header Ads

कडवे येथे डबल महाराष्ट्र केसरी, पंजाब केसरी, कर्नाटक केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन यासह देवा थापा नेपाळ अशा कुस्ती मैदानाचे आयोजन

 कडवे येथे डबल महाराष्ट्र केसरी, पंजाब केसरी, कर्नाटक केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन यासह देवा थापा नेपाळ अशा कुस्ती मैदानाचे आयोजन

----------------------------------

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते .

-------------------------------------

  शाहुवाडी तालुक्यातील कुस्तीपरंपरेने नटलेले  कडवे गाव  पुन्हा एकदा देशविदेशातील मल्लांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.  विठलाई देवीच्या यात्रेनिमित्त , ग्रामपंचायत कडवे, यात्रा कमिटी आणि मुंबईस्थित ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने २२मे २०२६रोजी या जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मा. सभापती विजय खोत यांनी दिली. यंदाचे हे कुस्ती मैदान

  खास आकर्षण म्हणजे आशिया खंडातील वजनी गटात गवसणी घालणारा कुस्ती  शौकिनाचा बादशहा पैलवान देवा थापा नेपाळ विरुद्ध पवन बंगूर हरियाणा हे उपस्थित राहणार आहेत.


डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर विरुद्ध पंजाब केसरी पैलवान गोगी यांच्यामध्ये एक नंबरची कुस्ती होईल. या मैदानात जिल्ह्यात प्रथमच डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर अशी लढत होत आहे.


 तर दोन नंबर मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान धनाजी कोळी  विरुद्ध कर्नाटक केसरी पैलवान कमलेश पाटील यांच्यामध्ये होईल. 


तर तृतीय कुस्ती पैलवान राहुल सुळे विरुद्ध पैलवान सतीश मुंडे महाराष्ट्र चॅम्पियन असा सामना रंगेल. 

 चौथ्या क्रमांकामध्ये कुमार पाटील शित्तूर  मोतीबाग विरुद्ध पृथ्वीराज पाटील पुणे यांच्यामध्ये होईल 

पाचव्या क्रमांकासाठी सुरज पाटील  शित्तूर विरुद्ध  गणेशचौगुले असा सामना होईल. या मैदानाचे खास आकर्षण असणारी कुस्ती म्हणजे नेपाळचा पैलवान देवा थापा विरुद्ध हरियाणा चा पैलवान पवन बंगूर अचित्य तरारक सामना मैदानासाठी आकर्षण असेल या सह शेकडो चटकदार कुस्त्या  शौकिनांना पाहायला मिळणार


 संपूर्ण तालुक्यात आणि पंचक्रोशीत कडवे हे  कुस्ती मातीचे लेणं  म्हणून ओळखले जाते. जुन्या काळापासून येथे देशभरातले मात्तबर मल्ल याच मातीत घडले आहेत. गावाचे ग्रामदैवत विठलाई देवीच्या साक्षीने हे पारंपरिक खेळ टिकून आहेत.

बुधवार, २२ मे २०२६, स्थळ:  जंगी कुस्ती मैदान, मौजे कडवे, वेळ: दुपारी २ वाजता या कुस्त्या होणार आहेत. 

यावेळी विजय खोत यांनी बोलताना सांगितले कि कुस्ती शौकिनांसाठी हा एक पर्वणीचा क्षण आहे. अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय   मल्लयुद्ध मैदान ग्रामीण पातळीवर गावच्या देणगीदारांच्या प्रेरणेमुळे व दातृत्वामुळे आजही टिकून असल्याचे अभिमानास्पद आहे. यात्रा कमिटी कडवेकर ग्रामस्थांनी सर्व भाविक, कुस्तीप्रेमी आणि पंचक्रोशीतील नागरिकांना या भव्य कुस्ती मैदानाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Powered by Blogger.