Header Ads

सिद्धगिरी कारागीर महाकुंभ २०२६चा सांगता समारंभ दिमाखात संपन्न.

 सिद्धगिरी कारागीर महाकुंभ २०२६चा सांगता समारंभ दिमाखात संपन्न.

---------------------

कोल्हापूर प्रतिनिधी :

संस्कार कुंभार.

---------------------

सिद्धगिरी महासंस्थान (कणेरी मठ) येथे सिद्धगिरी कारागीर महाकुंभ २०२६ या भव्य महोत्सवाचा सांगता समारंभ उत्साहात व दिमाखात पार पडला. सिद्धगिरी मठ व महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

समारंभास पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

ग्रामीण कारागिरांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. देशाच्या विविध भागांतून हजारो कारागीर या महाकुंभात सहभागी झाले होते. त्यांच्या उत्कृष्ट कलागुणांचे प्रदर्शन, पारंपरिक हस्तकलेचे सादरीकरण तसेच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध उपक्रम यावेळी पार पडले.

यावेळी स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्याचे तसेच स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले. स्वामीजींनी आपल्या आशीर्वचनातून भारतीय पारंपरिक कलेचे जतन करण्याची गरज अधोरेखित केली.

या महोत्सवामुळे कोल्हापूरच्या पर्यटन आणि सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडली असून, हा उपक्रम कारागिरांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, विविध पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.