Header Ads

सुनिल मोळे यांची पन्हाळा प्रेस क्लबच्या उपाध्यक्ष पदी निवड

 सुनिल मोळे यांची पन्हाळा प्रेस क्लबच्या उपाध्यक्ष पदी निवड

-------------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी ( आशिष पाटील)

------------------------------------

पन्हाळा:- फ्रंट लाईन न्यूज  महाराष्ट्र व सुपर भारत चे कळे विभागाचे प्रतिनिधी सुनील मोळे यांची पन्हाळा प्रेस क्लबच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड कोतोली येथील प्रेस क्लबच्या कार्यालयामध्ये करण्यात आली.

वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करणारे सुनील मोळे यांनी आजवर अनेक बातम्यांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम केले आहे. याची दखल घेऊन त्यांची निवड पन्हाळा प्रेस क्लब उपाध्यक्षपदी करण्यात आली.

यावेळी पत्रकार बाबासाहेब चौगुले यांनी मोळे यांच्या नावाला अनुमोदन दिले. पन्हाळा प्रेस क्लब चे अध्यक्ष किरण मस्कर, पत्रकार दशरथ खुटाळे. शिवाजी नांगरे, राजाराम सागावकर, उत्तम पाटील, संजय माने,आदी पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.