तारदाळ येथे कै. सदाशिवराव सातपुते उद्यानाचे उद्घाटन
तारदाळ येथे कै. सदाशिवराव सातपुते उद्यानाचे उद्घाटन.
----------------------
इचलकरंजी प्रतिनिधी.
लखन जाधव.
------------------------
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी तालुक्यातील तारदाळ येथील श्री चौंडेश्वरी सह गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या वतीने संस्थेच्या खुल्या भूखंडावर साकारण्यात आलेल्या कै. सदाशिवराव सातपुते उद्यानाचे उद्घाटन उत्साहात व दिमाखात संपन्न झाले.
या उद्यानाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे यड्रावकर व विठ्ठलराव डाके यांच्या हस्ते करण्यात आले.
परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळा, व्यायाम तसेच मुलांसाठी सुरक्षित खेळण्याची जागा उपलब्ध व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी या उद्देशाने या उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. उद्यानातील हिरवळ, बसण्याची सुविधा व स्वच्छ वातावरण यामुळे हे ठिकाण नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
या उपक्रमामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रेरणा मिळणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्रमुख मान्यवर तसेच नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: