पीक विमा भरपाई यादीत यवतमाळ जिल्हा तात्काळ दुरुस्ती करून समावेश करावा.. गोरसेना
पीक विमा भरपाई यादीत यवतमाळ जिल्हा तात्काळ दुरुस्ती करून समावेश करावा.. गोरसेना .
-----------------------
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी.
-----------------------------
गोरसेना ही शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी कार्यरत असलेला संघटना आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या सातत्याने सरकारपर्यंत पोहोचवत असतो.
यवतमाळ हा महाराष्ट्रातील प्रमुख कृषी जिल्हा आहे. येथे कापूस व सोयाबीन या दोन मुख्य पिकांवर शेतकऱ्यांचा अर्थकारण अवलंबून आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांनी २५७ कोटी रुपयांहून अधिक प्रीमियम भरला असतानाही पीक विमा भरपाईच्या पहिल्या टप्प्यात (३१ जिल्ह्यांच्या यादीत) यवतमाळ जिल्ह्याचे नाव वगळण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि अन्यायकारक आहे.
यामुळे लाखो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण आधीच जास्त आहे. यवतमाळ जिल्ह्याचा तात्काळ पीक विमा भरपाई यादीत समावेश करण्यात यावा.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ८ दिवसांत भरपाई वितरित करण्यात यावी.यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तात्काळ बैठक घेऊन समस्या सोडवण्यात यावी.ही बाब अतिशय गंभीर असल्याने तुम्ही तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा गोरसेना संघटना यवतमाळ व विदर्भातील शेतकऱ्यांसह मोठ्या आंदोलनाची तयारी करेल. त्यास होणाऱ्याच्या परिणामाची जबाबदारी शासन व प्रशासनावर राहिल असे निवेदन गोरसेना तर्फे तहसीलदार मार्फत चंद्रशेखर बावनकुळे कृषी मंत्री यांना देण्यात आले.

No comments: